सातारा : मेढ्यात मुख्याधिकाऱ्यांना घातला घेराव – Dainik Prabhat

Written by

करवाढ व इतर मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन
मेढा –
मेढा नगरपंचायतीसमोर आज दुपारी मेढ्याचे मुख्याधिकारी अमोल पवार यांना आंदोलकांनी घेराव घालत बोंबाबोंब आंदोलन केले.  त्यानंतर त्यांना निवेदन देऊन टाऊन प्लॅनिग नकाशाची होळी केली.
अवास्तव कर वाढ, इमारतींची होत नसलेली नोंद, अवास्तव टाउन प्लॅन खातेदार, रहिवासी, नागरिक व आता नगर रचना विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार मेढ्याच्या विकासाचा प्रस्तावित आराखड्याचा नकाशा नगरपंचायतीमध्ये गेल्या पंधरा दिवसापूंर्वी लावला असून हा नकाशा पाहिल्यावर अनेक व्यापारी, रहिवासी व शेतकरी यांनी आक्षेप घेऊन आज ते आंदोलनात सहभागी झाले.
या बाधित रहिवाशी व शेतकर्‍यांनी एकत्र येवून नगरपंचायतीच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. नगरपंचायत स्थापन होऊन पाच वर्षे संपली आहेत. या काळात बांधल्या गेलेल्या इमारतींची अधिकृत रित्या नोंद झालेली नाही. अवास्तव वाढीव घरपट्टीने पुरते बेजार झालेले मिळकतधारक त्या धक्क्यातून अजून सावरलेले नाहीत. तोच मेढ्याच्या अवास्तव टाउन प्लॅनचा शेतकरी, रहिवाशांना मातीत घालणारा नकाशा तयार करून नगरपंचायतीने अन्याय केल्याचे अनेकांनी भाषणांत सांगितले.
लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक व प्रशासक यांचा निषेध करण्यात आला . रहिवाशांच्या मिळकती अधिकृत करा, करातही भरमसाठ वाढ झाल्यावर ती रद्द गरजेचे होते. विकासाच्या अवास्तव कल्पना घेऊन बनविण्यात आलेला टाऊन प्लॅन रद्द करा, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच लोकप्रतिनिधींनी मेढ्यातील शासकीय जागा विचारात घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली .
वैतागलेले मिळकतधारक, बाधित रहिवासी व शेतकरी एकत्र येऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन ठिय्या आंदोलन करून नगरपंचायतीसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी गरीब विधवा निराधार महिलांना आपल्या व्यथा मांडताना अक्षरशः रडू आवरले नाही.
ईपेपरराशी-भविष्यकोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

Copyright © 2022 Dainik Prabhat
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares