सोरतापवाडी येथे शेतकऱ्यांनी रोखले अस्तरीकरण – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
उरुळी कांचन, ता. ७ : सोरतापवाडी (ता. हवेली) येथे सुरू असलेल्या नवीन कॅनॉलच्या अस्तरीकरणाचे काम सोमवारी (ता. ७) दुपारी स्थानिक शेतकरी तसेच ग्रामस्थांनी बंद पाडले. संबंधित विभागाने काम न थांबविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांतर्फे देण्यात आला. तत्पूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना अस्तरीकरण थांबविण्याबाबत निवेदन देण्यात होते.
सोरतापवाडी येथे नवीन कॅनॉल तसेच कोरेगाव मूळ (ता. हवेली) इनामदारवस्ती, कुंजीरवाडी ते यवतपर्यंत कॅनॉल अस्तरीकरण सुरू आहे. या दोन्ही कॅनॉलच्या पाण्यावर येथील शेतकरी शेती तसेच नर्सरी व्यवसाय करतात. या कॅनॉलसाठी जागा काही शेतकऱ्यांनी दिलेली आहे. यातील नवीन कॅनॉलला अस्तरीकरण करण्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. त्याला विरोध करून ज्येष्ठ नेते रामदास चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक चौधरी, राहुल गाढवे, देवेंद्र चौधरी, प्रशांत चौधरी, रणजित चौधरी, बंडोपंत चौधरी, अजिंक्य चौधरी, नाना चोरघे, अमर गाढवे, राजेंद्र चोरघे, भाऊसाहेब चौधरी आदींनी अस्तरीकरण थांबवले.
दरम्यान, पूर्व हवेलीतून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षातर्फे अस्तरीकरण थांबविण्यासाठी पुण्यात रविवारी (ता. ६) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले. यावेळी धर्मेंद्र खांडरे, संदीप अप्पा भोंडवे, अमित कांचन, अजिंक्य कांचन, आबासाहेब चव्हाण, खुशाल कुंजीर, करण धुमाळ आदी उपस्थित होते. तसेच माजीमंत्री विजय शिवतरे यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी नीलेश काळभोर, अलंकार कांचन, पारस वाल्हेकर, अजिंक्य चौधरी, हरीश कांचन उपस्थित होते. दरम्यान, उरुळी कांचन येथे शिवसेनातर्फे (शिंदे गट) तुपे वस्ती ते पाटबंधारे कार्यालय दरम्यान निषेध रॅली काढण्यात आली.
————————————————————————
कालव्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. कालवा पाझरून खराब होत आहे. त्या ठिकाणी अस्तरीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. याकामामुळे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. अस्तरीकरण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार आहे.
– शंकर बनकर, उपविभागीय अभियंता, यवत (ता. दौंड)
——————————————————————
00315
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares