Aaditya Thackeray : स्वतःचा इमान न विकणाऱ्या सच्च्या शिवसैनिकाला मिठी मारायला आलोय: आदित्य – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 07 Nov 2022 02:06 PM (IST)
Edited By: अक्षय गांधी
स्वतःचा इमान न विकणाऱ्या सच्च्या शिवसैनिकाला मिठी मारायला आलोय: आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray In Akola: शिवसैनिक म्हणून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणारा, ज्यांनी स्वतःला विकलं नाही, स्वतःचा मान सन्मान विकला नाही, इमान विकलं नाही अशा व्यक्तीला मिठी मारायला अकोल्यात आलो असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्रात उभे राहण्याची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन गद्दारी केली आहे. त्या गद्दारांना राज्यातील जनता धडा शिकवणार असल्याचा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. अकोल्यातील बाळापूर येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. 
आदित्य ठाकरे म्हणाले पुढे म्हणाले की, राज्यातील सरकार हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे हे लवकरच कोसळणार असून  तुम्ही सज्ज रहा. लोकांपर्यंत पोहोचा, लोकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. शिवसेनेची खरी ताकद हे सच्चे शिवसैनिक आहेत. हे सच्चे लढवय्ये माझ्या पिढीसाठी आदर्श आहे. जनतेमुळे मोठे झालेले 40 गद्दार महाराष्ट्रातून पळून गेले आणि त्यांनी जनतेचा विश्वासघात करुन हे सरकार स्थापन केले आहे. ते कोसळणारच असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.
अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल आहे. त्यांना मदत करण्याची गरज असताना हे गद्दार आमदार एकमेकांसोबत भांडण्यात व्यस्त असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. एकमेकांवर टीका करतात. मात्र शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची हिंमत यांच्यात नसल्याचेही सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गट आणि राणा-कडू यांच्यातील वादावर टीका केली. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळाली नसून फक्त हवेत घोषणा सुरु असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? हे देखील जनतेला कळायला मार्ग नसून या गद्दारांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गद्दारी केली आहे. विदर्भातील तरुणांसोबतही हे सरकार गद्दारी करत असून एक एक करुन सगळे प्रकल्प पळवून नेत आहे. त्यामुळे यांना धडा शिकविण्याची गरज असल्याचेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

हे चाळीस गद्दार लग्नातही गेले तरी लोकं त्यांना पन्नास खोके, एकदम ओक्के म्हणून चिडवतात. त्यामुळे हे गद्दार आता कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे नसल्याचीही सडकून टीकाही यावेळी त्यांनी केली. मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, महिलांच्या सन्मानासाठी, तरुणांच्या प्रश्नांसाठी तुमच्या सोबत उभा असल्याचेही यावेळी ते म्हणाले. तसेच त्यांनी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. चाळीस गद्दारांनीही राजीनामा द्यावा आणि राज्यातील जनतेला ठरवू द्या ते कोणाच्या पाठीशी उभे आहे असे आव्हानही दिले.
हेही वाचा
Eknath Shinde On Abdul Sattar: वाचाळवीरांना आवर घालण्यासाठी मुख्यमांत्रीकडून तातडीची बैठक, फोन करुन सत्तारांची कानउघाडणी
Abdul Sattars Remark On Supriya Sule : सत्तार यांना महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल, मिटकरी यांचा इशारा; कोण काय म्हणाले?
Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका, राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक
Aurangabad News : अब्दुल सत्तार यांची गलिच्छ भाषेत टीका, सुप्रिया सुळे म्हणतात…
Maharashtra Politics: श्रीकांत शिंदेंच्या सभेत आदित्य ठाकरेंचे कार्टून; अब्दुल सत्तारांनी सांगितले कारण
Aurangabad NCP Protest : औरंगाबादेत Abdul Sattar यांच्या घरावर राष्ट्रवादीकडून दगडफेक
Abdul Sattar on Supriya Sule : ‘सॉरी म्हणतो, शब्द मागे घेतो’; राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी 
Kiran Lohar : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहा अखेर निलंबित, राज्य शासनाकडून आदेश जारी 
R N Kulkarni Death: माजी आयबी अधिकाऱ्याच्या हत्येमागे भाजप नेत्यांना वेगळाच संशय, तर पोलीस म्हणतात…
Jalgaon News : गुलाबरावांविरुद्ध ठाकरे गटाचा मुंबईत एल्गार, मात्र जळगावात गुलाबराव समर्थकांकडून शोभायात्रेद्वारे स्वागत

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares