Latest Jalgaon News | नापिकी अन् कर्जाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
एरंडोल (जि. जळगाव) : सततची नापिकीमुळे खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या आर्थिक विवंचनेत असलेले कासोदा दरवाजा परिसरातील वयोवृद्ध शेतकरी नीळकंठ महादू खैरनार (वय ७४) यांनी रविवारी (ता. ६) दुपारी दीडच्या सुमारास पंकज काबरे यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. (old farmer commits suicide due to barrenness and debt Latest Jalgaon News)
हेही वाचा: Reality After Corona : मृतांच्या नावे दोनदा मदत, अनेकांना एकदाही नाही!
नीळकंठ खैरनार हे सततच्या नापिकीला कंटाळून अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त होते. त्यांनी खासगी सावकाराकडून देखील कर्ज घेतले होते. पिकांच्या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते होते. त्यांचा मुलगा विनोद खैरनार सुरतला असतो, दिवाळीनिमित्त तो एरंडोल येथे वडिलांकडे आला आहे. दीडच्या सुमारास विनोद खैरनार घरी असताना धीरज भोई यांनी नीळकंठ खैरनार यांनी पंकज कांबरे यांच्या शेतात झाडाला गळफास घेतला असल्याचे सांगितले.
विनोद खैरनार यांनी धीरज भोई, गोपाल पाटील, धनराज गुजर, बाळा वंजारी यांच्यासह शेताकडे धाव घेतली असता नीळकंठ खैरनार हे झाडाला गळफास घेऊन लटकलेले दिसले. विनोद खैरनार व त्यांच्या सहकाऱ्यांनी नीळकंठ खैरनार यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी यांनी त्यांची तपासणी करून ते मृत झाल्याचे सांगितले. शरद खैरनार यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील लोहार, अनिल पाटील तपास करीत आहेत.
शेतीबरोबर पानदुकानही
नीळकंठ खैरनार परिवारासह शेती काम करून चरितार्थ चालवत होते. पांडव गार्डन येथे रात्रीच्यावेळी ते पानदुकानही चालवत होते. यापूर्वी ते वसंत सहकारी साखर कारखान्यात नोकरीला होते. मात्र कारखाना बंद पडल्यामुळे त्यांच्यासमोर रोजगाराची समस्या निर्माण झाली होती. सद्यःस्थितीत ते शेतीकाम करून पान दुकान चालवून कुटूंबाचा चरितार्थ भागवत होते.
हेही वाचा: Chhagan Bhujbal : माजी मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares