Nagpur : पीक कचऱ्याची विल्हेवाट लावणार ‘बायोमास बॅंक’ – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
नागपूर : वायू प्रदूषण मोठी समस्या निर्माण झालेली आहे. दिल्लीत हिवाळा सुरू होताच पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशातील पिकांचा उरलेला कृषी कचरा जाळल्यामुळे प्रदूषणात वाढ होण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळेच पिकांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक समस्या झालेली आहे. हा कचरा जाळणे सुलभ मार्ग असला, वाढते प्रदूषण आणि मातीतील पोषक घटक कमी होत आहेत. हे शेतकरी हिताचे नाही. यावर उपाययोजना करण्यासाठी ‘बायोमास बँक हे स्टार्टअप सुरू केले आहे. देशातील अशाप्रकारचे पहिलेच ऑनलाइन मार्केटप्लेस आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये १५ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी मार्केट जोडणी तयार करणे. दरवर्षी एक लाख मेट्रिक टन कृषी-कचरा बायोमास गोळा करण्यात येणार आहे. त्यातून १५ कोटी रुपयांचे अतिरिक्त ग्रामीण उत्पन्न वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक अतिरिक्त स्रोत निर्माण होणार आहे. तसेच, हा उपक्रम म्हणजे कृषी कचऱ्याच्या शाश्वत व कार्यक्षम व्यवस्थापनाचा उत्तम पर्याय आहे. याशिवाय वातावरणीय बदलासाठी उपयुक्त ठरणारा आहे. बायोफ्युअल सर्कल ही बायोमास आणि बायोफ्युअल यासाठी भारताची पहिली ऑनलाइन मार्केटप्लेस ठरणार आहे.
पीक कचऱ्याची विल्हेवाट लावणार ‘बायोमास बॅंक’
बायोफ्युअल सर्कलद्वारे राज्यातील निवडक २० ठिकाणी बायोमास बँक स्थापित करण्याचा मानस आहे.बायोमास बँक ही डिजिटलदृष्ट्या सक्षम ग्रामीण व्यवसाय संकल्पना आहे. ती बायोफ्युअलसर्कलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून हरित ऊर्जेसाठी बायोमास संकलन, एकत्रीकरण, वाहतूक आणि ब्रिकेटिंग अशा गोष्टी सुलभ करते. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पामध्ये ग्रामीण अंमलबजावणी भागीदार म्हणून बीएआयएफ अॅग्रो आणि बायो-टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड काम पाहणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये अमरावती, हिंगोली, पुणे (आंबेगाव) आणि उस्मानाबाद जिल्हा येथील काही शेतकरी उत्पादक कंपनी आणि बचत गटांचा समावेश आहे.
एफपीओ आणि एसएचजीद्वारे स्थापित बायोमास बँका या शेतकऱ्यांशी डिजिटल स्वरूपात जोडल्या जातील. आगामी कापणीच्या हंगामामधील कृषी कचऱ्याच्या संकलनाला मदत करणार आहे. बायोफ्युअल सर्कल मार्केटप्लेस ही एकत्रित केलेल्या टाकाऊ घटकांचा औद्योगिक इंधन म्हणून अंतिम वापर करण्यासाठी अधिक मार्केट जोडणी व सेवा प्रदान करेल.
– सुहास बक्षी, सह संस्थापक
तळागाळापासून शेतकऱ्यांसोबत काम करण्यासाठी सज्ज झालो आहे. पिकाच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक समस्या आहे. तो कचरा जाळणे हा जरी सर्वांत सुलभ मार्ग असला, तरीही त्यामुळे मातीतील पोषक घटक कमी होत असल्याने असे करणे शेतकऱ्यांच्या हिताचे नसते. त्यासाठी बायोमास बँक ही उत्तम संकल्पना आहे.
– श्रीनिवास कुलकर्णी, संचालक, बीएआयएफ अॅग्रो आणि बायो टेक्नोलॉजी
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares