शिंदे सरकारला घरचा अहेर, आमदार गायकवाडांनी केलं आंदोलन – MSN

Written by

राहुल खंदारे, प्रतिनिधी
बुलडाणा, 24 ऑक्टोबर : राज्यात अस्मानी संकट आल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अशातच बाळासाहेबांची शिवसेना गटाचे समर्थक आमदार संजय गायकवाड हे आंदोलनाला बसले आहे. संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांसोबत चटणी भाकरी खाऊन एका प्रकारे निषेध केला आहे.
बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत राहतात. आजही त्यांनी चर्चा होईल असंच काही केलं आहे.
(…हे लबाडा घरचं आवताण, शरद पवारांचं शिंदे सरकारवर टीकास्त्र)
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे, शेतकरी अतिवृष्टीमुळे हताश झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला त्याच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार संजय गायकवाड यांनी चटणी भाकर खाऊन एक अनोखे आंदोलन केलं.
(‘खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही’ शिवसेनेचं मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र)
शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामे झाले मात्र मदत मिळाली नाही. त्यासाठी आज आमदार गायकवाड यांना आंदोलन करावं लागलं. मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाऊन ठाकरे यांच्यावरच जहरी टीका केली होती. मात्र आता शिंदे गटात असताना आणि सत्तेत असून ही संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथं शेतकऱ्यांना सोबत घेऊन चटणी भाकर खाऊन आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काहीही रक्कम न दिल्याने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर चटणी भाकरी खाऊन सण साजरा करत लक्षवेधी आंदोलन केलं.
(काल भारत-पाक सामन्यात मेलबर्न स्टेडियममध्ये बाळासाहेबांची शिवसेना पोहोचली, मुख्यमंत्र्यांचा दावा)
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असणा-या मुळा आणि भेंडा साखर कारखान्याने ऊस उत्पादकांच्या तोंडाला पानं पुसली. काहीही रक्कम न दिल्याने ऐन दिवाळीत शेतकरी हवालदिल झाले आहेत. आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळावे अशी मागणी करत आज भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर घरून बांधून आणलेली चटणी भाकरी खात लक्षवेधी आंदोलन केलं.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares