ऊस आंदोलनाची पडली ठिणगी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
०११६९
ऊस वाहतूक करणाऱ्या
ट्रॅक्टरच्या टायरी फोडल्या
बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक; ऊस आंदोलनाची पडली ठिणगी
इस्लामपूर, ता. ८ ः उसाला एकरकमी चार हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायरी फोडण्यात आल्या. येथील आरआयटी कॉलेज, खुंदलापूर वसाहत, बोरगाव वाळवा रस्त्यावर आज सायंकाळी टायरी फोडण्याचा प्रकार झाला. ऊस आंदोलनाची सांगली जिल्ह्यात ठिणगी पडली आहे.
एकरकमी ऊसदर घोषित न केल्याने ऊस आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. उसाला एकरकमी एफआरपी घोषित न करता व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन ही कारखान्यांनी गळीत हंगाम प्रारंभ केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज सायंकाळी त्यामुळेच बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरच्या टायरी फोडल्या. या घटनेने आंदोलनाचा भडका उडण्याचे संकेत आहेत.
एकरकमी एफआरपीसाठी विविध संघटना आंदोलन करीत आहेत. संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री दत्त इंडिया, दालमिया कोकरूड यांनी एकरकमी एफआरपीची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील खासगी कारखाने एकरकमी एफआरपी देत आहेत. मात्र, सहकारी साखर कारखाने मूग गिळून गप्प का आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात २३ खासगी आणि सहकारी कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यात मात्र अळी मिळीची भूमिका सहकारी साखर कारखान्यांनी घेतल्याचे दिसत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares