केळीला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला केळीच्या घडांचा गुरांना चारा म्हणून – ABP Majha

Written by

By: भिकेश पाटील, एबीपी माझा | Updated at : 13 Feb 2022 07:18 AM (IST)
Edited By: निलेश झालटे
Nandurbar News Updates banana rate issue
Nandurbar News Updates : नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचे (Banana Farming) उत्पन्न घेतले जात असते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून केळीच्या दराची समस्या मोठ्या प्रमाणात भासत आहे.  व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. केळीला भाव नसल्याने शहादा तालुक्यात शेतकरी आपल्या शेतात असलेलं केळीचे घड जनावरांना टाकत असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे . 
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा आणि नंदुरबार तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पन्न घेतले जाते. यावर्षी जिल्ह्यात पाच हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर केळीची लागवड झाली. मात्र केळीला दोन ते तीन रुपये परत प्रति किलो दर मिळत आहे आणि त्यात व्यापारी मनमानी करत आहे. व्यापारी केळीची तोड करण्यासाठी येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात आता दर मिळत नसल्याने शेतकरी केळीचे घड जनावरांना खाण्यास टाकत असल्याचे समोर आले आहे. मायबाप सरकारने आता तरी केळी उत्पादक  शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे ही अपेक्षा आहे, अशी भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत.  
द्राक्ष आणि संत्रीप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी प्रक्रिया उद्योग उभारून व्यापाऱ्यांची मनमानी थांबवावी असंही काही शेतकऱ्यांची मागणी आहे. 
लागवडीपासून एकरी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च

केळी लागवडीपासून एकरी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. ऐन काढणीच्या वेळी व्यापारी मनमानी करत असतात. त्यात व्यापारी येत नसल्याने केळीचे घड झाडावर पिकत असल्याने प्रशासनाने व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घेत मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अस्मानी संकटाशी सामना करत रक्ताचे पाणी करून तयार झालेल्या केळीच्या खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने सोन्यासारखे पीक मातीमोल होत असल्याचे चित्र आहे. आता तरी शेतकऱ्यांच्या केळी खरेदीसाठी मायबाप सरकारने भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
इतर महत्वाच्या बातम्या
काढायलाही परवडत नाही म्हणून झाडावरच पिकतायेत केळी! शेतकरी हवालदिल; केळीच्या बागा केल्या उध्वस्त
शेतकऱ्याचा संताप! केळीचे भाव पडल्याने बागच कापून टाकली, नांदेडमधील तरुण शेतकऱ्याची व्यथा
दराअभावी केळी मातीमोल! शेतातच पिकू लागली केळी; व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा बळीराजाला फटका
Wardha Rains :राज्यावर अवकाळी पावसाचं संकट, गहू, चणा, तूर, केळी, कपाशीसोबतच इतर पिकांच नुकसान
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha
Nagpur Agriculture Department : कृषी विभागात अधिकाऱ्यांचा दुष्काळ, अनेक जबाबदाऱ्या प्रभारींच्या खांद्यावर
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उग्र आंदोलन करणार; रविकांत तुपकरांचा इशारा 
Farmers News : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी सांप्रदायानं प्रबोधन करावं, कृषीमंत्री सत्तारांचं आवाहन, वारकरी साहित्य परिषदेची मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार 
Aurangabad: औरंगाबादेत बैलगाडा शर्यतीवरून राडा; बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
Lumpy Skin : लम्पी आजारामुळं गुरांचे बाजार बंद, नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प
Earthquake : दिल्ली-NCR ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र; 3 जणांचा मृत्यू
Todays Headline : भारत जोडो यात्रेचा तिसरा दिवस आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांचा आज सरन्यायाधीशपदी शपथविधी, आज दिवसभरात
9 November In History : उत्तराखंडचा स्थापना दिवस, सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी मुहम्मद इक्बाल यांचा जन्म ; आज इतिहासात
Navi Mumbai : नवी मुंबईतल्या रखडलेल्या रिअल्टी प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सरकारकडून चार सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन
CJI Uday Lalit : सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कोर्टाला भावपूर्ण निरोप, पायऱ्यांवर डोकं ठेवून अभिवादन

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares