दिवसभरात देश-राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लीकवर – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ह्या यात्रेतील कार्यकर्त्यांनी हातात मशाल घेवून प्रवेश केला आहे. ही यात्रा काही दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून जाणार आहे.
पुण्यातील जांभूळवाडी रस्त्यावर भिषण अपघात या अपघातात १० ते १२ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात कंटेनर आणि बस मध्ये झाला. बसने कंटेनर ला पाठीमागून धडक दिली. यात १० ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ह्या यात्रेतील कार्यकर्त्यांनी हातात मशाल घेवून प्रवेश केला आहे. ही यात्रा काही दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून जाणार आहे.
आदित्य ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले " 40 गद्दारांनी महाराष्ट्राचे राजकारण घाणेरडं केले आहे."
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करताना हातात मशाल घेवून येणार आहेत.
लाच घेताना रंगेहाथ पकडलेले प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना जामीन मंजूर झाला आहे. तर पुणे लाचलुचपत विभागाकडून लोहारांच्या खुल्या चौकशीला मान्यता दिली आहे.
सुप्रिया सुळेंवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेल्या विधानावरून आता पुण्यात राष्ट्रवादीने निषेध व्यक्त केला आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात अब्दुल सत्तार यांच्या फोटोला काळं फासून महिला कार्यकर्त्यांनी निषेध केला.

सुप्रिया सुळे यांच्यावरील आक्षेपार्ह टीके नंतर सत्तारांविरोधात राष्ट्रवादी कडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सत्तार यांनी पातळी सोडून सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' अशी टीका सत्तार यांनी केली. सत्तेची हवा सत्तरांच्या डोक्यात घुसली आहे असा हल्लाबोल नीलेश लंके यांनी केला आहे. अब्दुल सत्तार म्हणजे एक सरडा आहे असंही ते म्हणालेत.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्या बाबत त्यांचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा महिलांचा सन्मान ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आहे….. खोके घेऊन बोके इतके माजलेत की ते महाराष्ट्र धर्म विसरले आहेत अशी टीका केदार दिघे यांनी केली आहे.
सत्तार यांनी पातळी सोडून सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' अशी टीका सत्तार यांनी केली. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी मी असं काही म्हणालो नाही असं ते म्हणालेत.
अब्दुल सत्तारांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येत आहे. अब्दुल सत्तारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी घराच्या काचा फोडल्या आहेत.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसदरत्न माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविरुद्ध अपमानास्पद उद्गार काढले आहेत. महिलांविरुद्ध अपमानास्पद उद्गार काढून त्यांचा सामाजिक दर्जा व कर्तुत्व हनन करणे हा या सरकारचा मुख्य अजेंडा आहे असे मागील एक दोन घटनांवरून स्पष्ट होत आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी केला. तरी या प्रकरणी श्री. अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, ई-मेल द्वारे पत्र पाठवून महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्याकडे केली आहे.

सत्तार यांनी पातळी सोडून सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' अशी टीका सत्तार यांनी केली. याबाबत बोलताना कोल्हे म्हणाले की अब्दुल सत्तारांची मस्ती उतरवू
सत्तार यांनी पातळी सोडून सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' अशी टीका सत्तार यांनी केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तरांवर मी बोलणार नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली आहे. सत्तार यांनी पातळी सोडून सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' अशी टीका सत्तार यांनी केली. त्यावर आता संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. हा शब्द वापरणं चुकीचं आहे तसंच त्यांनी त्यांचा शब्द मागे घ्यावा असंही दीपाली सय्यद म्हणाल्यात.
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली आहे. सत्तार यांनी पातळी सोडून सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' अशी टीका सत्तार यांनी केली. त्यावर आता संतप्त प्रतिक्रिया येत आहेत सत्तारांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी केली आहे.
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली आहे. सत्तार यांनी पातळी सोडून सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या' अशी टीका सत्तार यांनी केली. 
सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक मागासांसाठीचं 10 टक्के आरक्षण कायम ठेवण्याचा मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, या आरक्षणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे. हे आरक्षण म्हणजे मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चित्रपट बनवणाऱ्यांनी इतिहासाची मोडतोड करू नये, हे अजिबात सहन केले जाणार नाही, अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी दिग्दर्शकांना इशारा दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं.
राजू शेट्टी यांनी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांच आभार मानलं आहे. प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा आहे.कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. म्हणून एफआरपी मागत आहोत. एक रकमी एफआरपी मिळत होती, मात्र महाविकास आघाडी सरकारने दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तो निर्णय आता सरकारने बदलावा. एक रकमी एफआरपी मिळावी हीच मागणी आहे. वजनकाटा पाडी मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत आहे. सगळे वजन काटे डिजिटल करा. पुढे काय निर्णय घ्यायचा हे साखर आयुक्तालयात घेऊ असंही शेट्टी म्हणाले आहेत.
आर्थिदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना मोठा दिलासा दिला असल्याचं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. मोदी सरकारने निर्णय घेतला होता आज कोर्टाने त्यावर शिक्कमोर्तब केला आहे. मोदी यांचा सबका साथ होणार आहे.राज्यात एमपीएससी विद्यार्थी यांचं भवितव्य टांगणीला लागले होते पण आता त्यांना दिलासा मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये आज जो निर्णय दिला आहे, त्याचे मी मनापासून स्वागत करतो. सर्व जाती-धर्मांतील गरीब आणि दुर्बल घटकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातला निर्णय हा गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल झाले आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना गेल्या 3 दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना आज मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल परिसरात गर्दी करू नये असं आवाहन भुजबळ यांच्याकडून करण्यात आलं आहे.
ठाकरे गटाकडून शिवसेना भावनासमोर आंदोलन करण्यात येत आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महिला कार्यकर्त्यानी गुलाबराव पाटील यांच्या फोटोला जोडे देखील मारले आहेत.
आदित्य ठाकरे आज अकोला, बुलढाणा आणि औरंगाबादमध्ये शेतकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांचं अकोल्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे.
दोन तुकड्यातील एफ.आर.पी.चा केलेला कायदा रद्द करून पुन्हा FRP एकरकमी करा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पुण्यात धडक मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा पुण्यातील अलका टॉकीज चौकातून निघणार आहे. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली असून १२ वाजता मोर्चा सुरू होणार आहे. साखर आयुक्तालय पर्यंत मोर्चा जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून दंगा विरोधी पथक, राज्य राखीव दल देखील तैनात करण्यात आलं आहे. राज्यातील ऊस उत्पादक, शेतकरी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थितीत राहणार आहेत.
केंद्राने दिलेल्या आर्थिक आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी 10 टक्के आर्थिक आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आर्थिक दुर्बल घटकांचं आरक्षण वैध असल्याचं 4 न्यायमूर्तीनी म्हंटलं आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल गटाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे.
आर्थिक आरक्षण घटनाविरोधी नाही- न्या. माहेश्वरी
आर्थिक दुर्बल गटाच्या आरक्षणावर सुनावणी सुरू
न्या. माहेश्वरी यांच्या मताशी न्या बेला त्रिवेदी सहमत
आर्थिक आरक्षण वैध असल्याचं दोन्ही न्यायमूर्तीचं मत
आरक्षणाची कालमर्यादा असावी – न्यायमूर्ती
आर्थिक आरक्षण न्यायालयात वैध
पाचपैकी 4 न्यायमूर्तींकडून आरक्षण वैध
केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात त्रुटी आढळल्या आहेत. गर्दीची ठिकाणं असल्याने या ठिकाणी घातपाताची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. पोलिसांकडून महापालिका आयुक्तांना अहवाल देण्यात आला आहे. सुरक्षिततेंदर्भात उपाययोजना करण्याच्या देखील सूचना केल्या आहेत. मंदिराच्या सुरक्षेबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी महापालिका आयुक्त यांच्यासह धर्मदाय आयुक्त यांना याबाबत पत्र लिहले आहे.
गणेशउत्सवा दरम्यान तसेच इतर दिवशी शनिवारवाडाच्या बाहेरील परिसरात अनधिकृत दुकाने लावण्यास परवानगी देऊ नका, पुरातत्व विभागाचे आयुक्तांना पत्र लिहले आहे. विश्रामबाग पोलिसांना देखील या संदर्भात पुरातत्व विभागाने पत्र लिहले आहे. घातपात होण्याची शक्यता असल्याने दुकाने उभी करू नका. भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणात त्रुटी आढळल्याने हे पत्र लिहण्यात आले आहे.
काय लिहले आहे पत्रात?
शनिवारवाडा हे एक सरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आणि ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येते या ठिकाणी देशा विदेशातील पर्यटक शनिवारवाडा पहाण्यासाठी येत असतात तारीख ०४/४/२०२२ या दिवशी शनिवारवाडा पुणे येथे केन्द्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलीस यंत्रणा यानी सर्वे केला होता. शनिवारवाडाच्या बाहेरील बाजुची पाहणी केले असता त्याना काही त्रुटीची कमतरता जाणवली. गणेशउत्सवा दरम्यान शनिवारवाडाच्या बाहेरील बाजुला जी दुकाने लावली जातात ती पूर्णपने अनाधिकृत असतात त्यावेळी शनिवारवाडाच्या बाजूला शिवाजी रास्ता आहे तेथे पत्रा शेड तसेच मंडप लाउन दुकाने तयार केली जातात पत्रा पोड लावल्यामुळे तेथे घातपात होण्याची शक्यता नकारता येत नाही. गणेशउत्सवानंतर शनिवारवाडाच्या परिसरात कचरा टाकला जातो त्यामुळे तेथे दुर्गंधी होते तसेच इतर दिवशी देखील दुकान तावली जातात ज्यामुळे शनिवारवाडाच्या बाहेरील परिसरात दुकानदार कचरा टाकतात त्यामुळे तेथे दुर्गधी होते
आर्थिक आरक्षण घटनाविरोधी नाही- न्या. माहेश्वरी
आर्थिक दुर्बल गटाच्या आरक्षणावर सुनावणी सुरू
न्या. माहेश्वरी यांच्या मताशी न्या बेला त्रिवेदी सहमत
आर्थिक आरक्षण वैध असल्याचं दोन्ही न्यायमूर्तीचं मत
आरक्षणाची कालमर्यादा असावी – न्यायमूर्ती
आर्थिक आरक्षण न्यायालयात वैध
पाचपैकी 4 न्यायमूर्तींकडून आरक्षण वैध
शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कॅडी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आज औरंगाबामध्ये सिल्लोड येथे सभा घेत आहेत. यानिमित्त सभास्थळी एक लाखांहून अधिक लोकांची गर्दी जमा होईल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे. सभास्थळी जय्यत तयारी सुरु आहे. तर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बुलढाण्यात सभा घेणार. आदित्य सभेवर ठाम. आदित्य ठाकरे आज अकोल्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांशी संवाद साधणार. 
एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज साखर संकुल पुणे येथे राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एकरकमी एफआरपी करा, या प्रमुख मागणीसाठी अन्य मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबईतील अंधेरी पूर्व – पश्चिमला जोडणारा गोखले पुल आजपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा पुल धोकादायक असल्यामुळे मुंबई महापालिकेने वाहतूक पोलिसांकडे बंद करण्यासाठी पत्र दिले होते. रविवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग फार दूर असल्यामुळे वाहतूक कोंडीचा देखील यापुढे मुंबईकरांना सामना करावा लागणार आहे. हा पूल अत्यंत जीर्ण झाला होता मागील दोन वर्षापासून त्याची एक मार्गीका पूर्णपणे बंद करण्यात आला होता. पर्यायी मार्ग म्हणून कॅप्टन गोरे ब्रीज, मिलन सबवे,खार सबवे ,ठाकरे उड्डाणपूल,अंधेरी सबवे हे मार्ग वापरता येणार आहेत.
पश्चिम रेल्वेची मुंबईकडे येणारी लोकलसेवा सेवा उशिराने सुरू आहे. 10 ते 20 मिनिटे उशिराने लोकलसेवा सुरू आहे. वैतरणा-विरार दरम्यान सिग्नल यंत्रणा फेल झाल्यामुळे उशिराने लोकलसेवा सुरू आहे. याचा फटका सामान्य, नोकरदारांना बसत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares