दोन्ही काँग्रेस जोरात, राज्यात रंगले जोडो-तोडोचं राजकारण – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
मुंबई – देशातल्या राजकारणात काँग्रेस (Congress) आणि महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) यांचा एकेकाळी फार दबदबा होता. मात्र, भाजपाच्या नव्या दमाच्या लोकांनी दोन्ही काँग्रेसना भूईसपाट केले. मात्र, सध्या दोन्ही काँग्रेसकडून जोडो आणि तोडोचे राजकारण सुरू आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या उभारीसाठी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatr) सुरू केली आहे. तर, हर हर महादेवच्या (Har Har Mahadev Conflict) निमित्ताने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तोडफोडीचं राजकारण सुरू झालं आहे.
हेही वाचा – भारत जोडो यात्रेतून महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आलो : राहुल गांधी
२०१४ मध्ये मोदी लाटेत काँग्रेस पक्ष पिछाडीवर पडला. त्यामुळे काँग्रेसमध्ये कमालीची मरगळ आली होती. २०१९ मध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. त्यानंतर सोनिया गांधी या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा होत्या. परंतु, पक्षाची अवस्था अगदीच केविलवाणी झाली होती. कोरोना काळात केंद्र सरकारच्या धोरणांवर राहुल गांधींनी टिकास्त्र डागलं होतं. शेतकरी कायद्याविरोधातही राहुल गांधींनी शेतकऱ्यांची बाजू घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला होता. मात्र, यामुळे केंद्रातील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस सक्षम बनला नाही. अखेर, पक्षाला नव्या अध्यक्षाची गरज असल्याचं पक्षातीलच नेत्यांकडून सुचवण्यात आलं. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून बरीच खडाजंगी झाल्यानंतर अखेर मल्लिकार्जुन खर्गे पक्षाचे अध्यक्ष बनले. या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती.
हेही वाचा आधी झळकली पोस्टर, आता राहुल गांधींसह यात्रेत; अशोक चव्हाणांची लेक राजकारणात उतरणार?
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. ही यात्रा दक्षिण भारतातील सर्व राज्यांना भेट देत आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. दक्षिण भारतात भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला. अनेकांनी या यात्रेत सहभाग होत राहुल गांधींना पाठिंबा दिला. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसला बळकटी आणण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नांना यश येत असल्याचं स्पष्ट होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह कलाकारांनी त्यांना समर्थन देत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.
ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. महाराष्ट्रात ३४४ किमी ही यात्रा चालणार आहे. राहुल गांधी महाराष्ट्रात एकूण १४ ठिकाणी थांबणार आहे. ही यात्रा १५ विधानसभा आणि ६ लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. महाराष्ट्रातील नांदेड, वाशिम, अकोला, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे.
हेही वाचा – राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन
एकीकडे काँग्रेसकडून भारत जोडोचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीकडून मात्र तोडफोडीची भाषा सुरू आहे. हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या दोन्ही मराठी ऐतिहासिक चित्रपटात चुकीचा इतिहास सांगितला असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात रात्री विवियाना मॉलमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसंच, प्रेक्षकांवर दमदाटी केली. प्रेक्षकांनी सिनेमाचे पैसे परत मागितल्याने त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – मावळा गोरापान, चिकना कधी होता? हर हर महादेव चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा सवाल
तर, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अब्दुल सत्तारांविरोधात राज्यभर आंदोलन सुरू आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरला होता. यावरून अब्दुल सत्तारांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येतेय. यासाठी मुंबई, ठाण्यासह पुणे, औरंगाबाद, बीड येथे अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तर, काही ठिकाणी प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले आहे.
हेही वाचा – शो बंद पाडल्याने प्रेक्षकानेच केली तक्रार; आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
दोन्ही पक्षांना खरंतर कात टाकण्याची गरज आहे. त्यानिमित्ताने काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्ष बदलीमुळे पक्षाला चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर, दुसरीकडे राहुल गांधींनीही जोमाने तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जिंकायचं असेल तर त्यांना प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागणार आहे. त्यासाठीच राहुल गांधी यांनी प्रयत्न सुरू केले असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने राष्ट्रवादीलाही जोमाने तयारी करण्याची गरज आहे, असंही विश्लेषकांनी सांगितलं.
हेही वाचा – शिवरायांचे भक्त म्हणवता मग हे वागणं शोभतं का? ‘हर हर महादेव’च्या दिग्दर्शकाचा संताप
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares