‘स्वराज्यक्रांती’तर्फे उपोषणाचा इशारा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
‘स्वराज्यक्रांती’तर्फे उपोषणाचा इशारा
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळवून देण्यासाठी गुरुवारपर्यंत (ता. १०) तत्काळ बैठक लावावी, अन्यथा शुक्रवारपासून (ता. ११) जयसिंगपुरात क्रांती चौकात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा स्वराजक्रांती जनआंदोलनतर्फे आदम मुजावर यांनी दिला आहे. मागणीचे निवेदन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३२२० ‌रुपये जाहीर केला आहे. शिरोळ तालुक्यात हा दर मिळत नाही म्हणून शिरोळ तालुक्यातील शेतकरी व नागरिकांकडून गेले अनेक दिवस शांततेत आंदोलन सुरू आहे. तातडीने बैठक लावून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares