Akola : सिंचनाच्या प्रमाणात विजेचे नियोजन शून्य – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
रिसोड : खरीप हंगामाने निराशा केल्यानंतर शेतकरी आता रब्बीच्या तयारीला लागला आहे. यावर्षी जलसाठा मुबलक प्रमाणात आहे. विजेची समस्या यावर्षी मात्र कायमच आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा व दिवसा वीज द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे. शासनाने लघु तथा मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा केली आहे, मात्र त्या प्रमाणात विजेचे नियोजन केल्या गेले नाही.
यावर्षी सुरुवातीपासूनच भरपूर पाऊस झाल्यामुळे तसेच ऑक्टोंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्या काठाच्या व पाणथळ जमिनीतील खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आता शेतकऱ्याची भिस्त ही रब्बीवर आहे.
संपूर्ण जिल्ह्यात रब्बी साठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची मशागत करून शेतकऱ्यांची रब्बीच्या पेरणीची लगबग वाढली आहे. यावर्षी खरीप हंगामामध्ये सोयाबीनचा पेरा ५७ हजार हेक्टर वर होता तेवढ्याही क्षेत्रावर रब्बीची लागवड होणार आहे. यावर्षी पावसाळा भरपूर झाल्यामुळे विहिरी मध्यम व लघु प्रकल्पामध्ये तुडुंब जलसाठा आहे. परंतु वीज पुरवठा सुरळीत व नियमित होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याही वर्षी विजेची समस्या कायमच असल्याची माहिती आहे.
शासनाने सिंचनाची सुविधा केली आहे. परंतु त्या प्रमाणात विजेचे नियोजन नसल्यामुळे दरवर्षी रब्बी हंगामामध्ये विजेचा तुटवडा निर्माण होतो. कधी कधी तर विजे अभावी उभी पिके सुकून जातात. रब्बी हंगामा करीता नियमित व दिवसा विजपुरवठा करावा तशेच जळालेले रोहित त्वरित दुरुस्त करून द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे.
मागील दशकात शासनाने सिंचनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात केले आहे तालुक्यात मध्यम व लघु प्रकल्पाची निर्मिती केली आहे परंतु त्या प्रमाणात विजेचे नियोजन केले नसल्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहात आहेत वाडी रायताळ व पळसखेड या प्रकल्पामुळे जवळपास दोन हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येत आहे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून या परिसरामध्ये वीज उपकेंद्र उभारावे.
– घनश्याम मापारी, सचिव सरपंच संघटना वाशिम जिल्हा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares