Farmers Protest: औरंगाबादेत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचं 'जलसमाधी' आंदोलन थेट – ABP Majha

Written by

By: मोसीन शेख | Updated at : 09 Nov 2022 01:30 PM (IST)

Aurangabad Farmers Protest
Aurangabad Farmers Protest: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले आहे. जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) भरल्यावर धरणाचे पाणी थेट शेतात घुसते त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होते असल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. यावेळी महिला शेतकरी देखील धरणाच्या पाण्यात उतरल्याचं पाहायला मिळाले. 
गंगापूर तालुक्यातील अंमळणेर येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडी धरण सुरु झाल्यापासुन जेव्हा जेव्हा धरण 70  ते 75 टक्के भरतो, त्यावेळी धरणाचे पाणी हे संपादीत जमिनीच्या व्यतिरीक्त इतर जमिनींमध्ये शिरते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होते. यामुळे खरिपाबरोबर रब्बीचे देखील नुकसान होते. तर याबाबत वारंवार जायकवाडी विभागाला पत्र व्यवहार करुन देखील त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. तसेच कोणतेही नुकसानभरपाई देखील दिलेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले आहे.
शेतकऱ्यांची न्यायालयात धाव…
यापूर्वी संबधित शेतकऱ्यांनी गंगापुर तहसिल कार्यालय व जायकवाडी विभागाला लेखी तक्रार केली. मात्र कोणतेही दखल घेण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यावेळी जायकवाडी, पाटबंधारे विभागाविरुध्द रिट याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान अपीलामध्ये संपुर्ण सुनावणी नंतर अपीलाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजुने लागला. मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जायकवाडी विभागाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. पाटबंधारे विभाग जानुनबुजुन हा विषय प्रलंबित ठेवत असुन एकप्रकारे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यात येत असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे. 

REELS
शेतकरी उतरले पाण्यात…
यावर्षी अतिवृष्टी झाल्याने जायकवाडी धरण 100 टक्के भरला होता. त्यामुळे जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजूबाजूच्या शेतात देखील पाणी घुसले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी अनकेदा शासकीय कार्यालयाच्या खेट्या मारल्या, पण तरीही त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले आहे. यावेळी शेतकरी पाण्यात उतरले होते. सोबतच महिला शेतकरी देखील यावेळी उपस्थित होत्या. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी केली. 
औरंगाबाद पुन्हा हादरल! भाजी विक्रेत्या वृद्ध महिलेची हत्या, घटनास्थळी पोलीस दाखल
Nagpur Police : मोक्का आरोपीच्या क्रेडिट कार्डने ‘त्या’ अधिकाऱ्याने खरेदी केला आयफोन? व्हायरल होत आहे सीपींना पाठविलेले पत्र
Sanjay Raut : मी 103 दिवस तुरुंगात राहिलो, 103 आमदार निवडून आणणार; संजय राऊत कडाडले
Pune Metro : पुणे मेट्रो होणार स्मार्ट! पुणेकरांना व्हॉट्सअपवर मिळणार तिकीट
Maharashtra News Updates 09 November 2022 : Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार नाहीत; सूत्रांची माहिती
एमपीएससीच्या मुंबईतल्या कार्यालयाच्या बांधकामाला अखेर मंजुरी, सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी
Sanjay Raut Full Speech : चिन्हा गोठवणाऱ्यांच्या छाताडावर बसून शिवसेनेचं वैभव परत आणू
CM Eknath Shinde on Sanjay Raut Bail : संजय राऊत यांच्या जामिनावर प्रवक्ते बोलतील
Sanjay Raut UNCUT : उद्यापासून मी पुन्हा कामाला लागणार, संजय राऊत यांचा विरोधकांवर हल्लाबोल
Sanjay Raut: मी शिवसैनिक, जेलमध्ये अनेक कैद्यांना मदत केली…; संजय राऊतांनी कोणत्या कैद्यांना मदत केली?
IND vs ENG : ‘पराभूत व्हायचंय तर इंग्लंडविरुद्ध व्हा,पाकिस्तानकडून पराभव सहन होणार नाही’,भारतीय चाहत्यांचा टीम इंडियाला मेसेज, सेमीफायनलपूर्वी हटके मीम्स व्हायरल

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares