Latest Marathi News | वीजपुरवठ्या अभावी पिके पाण्यावाचून होरपळताय, आम्ही शेती करावी की नाही; शेतकऱ्यांचा सवा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
चांदवड (जि. नाशिक) : शेतीला चारच तास वीज पुरवठा होतो आहे. पिकांना पाणी द्यायचे तरी कसे. आम्ही शेती करावी की नाही असा सवाल चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीच्या कारभारामुळे पडला आहे. (Crops wither due to lack of power supply farmers in crisis at chandwad Nashik Latest Marathi News)
अस्मानी संकटाने बळीराजा पुरता होरपळलेला आहेच आता सुलतानी संकटाने चांदवड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. विहीरीत काठोकाठ पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येईना. बाप भिक मागू देईना अन् आई पदर पसरु देईना अशी अवस्था चांदवड च्या अनेक गावांतील शेतकऱ्यांची झाली आहे. अगोदरच लोडशेडींग मुळे फक्त आठच तास थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. आता फक्त चारच तास थ्री फेज वीजपुरवठा केला जातो आहे.
चारच तासांच्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही.विहीरीत पाणी असूनही पाण्याअभावी पिके होरपळून चालली आहेत. डोळ्यांदेखत पिकांचे हाल शेतकऱ्यांना पाहवेना. अगोदर अतीवृष्टीमुळे पिकं खराब झालेली आहेत. आता कशीबशी पिकांना पोटच्या पोरावानी जीव लावून सुधारली होती त्यातच महावितरणच्या भोगंळ कारभारामुळे शेतीपंपांना थ्री फेज वीजपुरवठा नियमित केला जात नसल्याने पिके होरपळताय. दिवसा फक्त चारच वीजपुरवठा तोही सुरळीत नाही. इतर वेळा सिंगल फेज पुरवठा ही वेळेवर होत नाही.
हेही वाचा: Sadabhau Khot : आजचा शत्रू उद्याचा मित्र, तर उद्याचा मित्र परवाचा शत्रू…: सदाभाऊ खोत
तेव्हाही वीजेचा लंपडावच असतो.१३२ के.व्ही सब स्टेशनच्या ओव्हरलोड मुळे आठ तास विजपुरवठा होत नसल्याचे महावितरण चे अधिकारी सांगत आहेत. ओव्हरलोड मुळे घरगुती ग्राहकांनाही सुरळीत वीजपुरवठा होत नाही.बहुतांश वेळा रात्रीचे अंधारातच ग्रामिण भागातील नागरिकांना रहावे लागते. अंधारामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . महावितरण कंपनीने शेतीला व घरगुती ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
"आम्हाला वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने रात्री अंधारात रहावे लागते. आमच्या आदीवासी वस्तीत लाइट नसल्यास साप, वींचू , कुत्रे अशा प्राण्यांची भितीतच आम्हाला रात्र काढावी लागते.आमचा वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल."
– सुनील मारुती पिंपळे, निमोण
"ओव्हरलोड मुळे १३२ के. व्ही सबस्टेशन वरूनच ट्रिपींग येत असल्यामुळे नाइलाजाने आम्हाला चार चार तास वीजपुरवठा करावा लागतो."– उमेश पाटील, उप अभियंता, उपविभाग चांदवड
हेही वाचा: Nashik : रुग्णवाहिका चालक, डॉक्टरांची हेळसांड; विश्रांतीसाठी रूम देण्यास टाळाटाळ
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares