Piyush Goyal On Cotton : भारतीय कापसाचे ब्रँडिंग करण्याची हीच योग्य वेळ, चांगल्या उत्पादकतेसाठी – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 09 Nov 2022 07:15 AM (IST)
Edited By: गणेश लटके
Cotton ( Image Source : Getty )
Piyush Goyal On Cotton : भारतीय कापसाचे ब्रँडिंग (Branding of Indian Cotton) करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी व्यक्त केले. ग्राहकांमध्ये कस्तुरी ब्रँडेड उत्पादनांसाठी निष्ठा आणि आकर्षण निर्माण करण्यावर गोयल यांनी भर दिला. पीयूष गोयल यांनी कापूस मूल्य साखळी संबंधी उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे वस्त्रोद्योग सल्लागार गटाबरोबर बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. गोयल यांनी कस्तुरी कॉटनची गुणवत्ता, शोध क्षमता आणि ब्रँडिंग यावर भर देण्यासाठी उद्योग आणि त्यांच्या नामित संस्थेने केलेल्या कामाचे कौतुक केले. उद्योग क्षेत्राच्या योगदानाएवढा निधी देऊन सरकार उपक्रमाला पाठिंबा देईल असेही ते म्हणाले.
कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या कापूस बियाणांचा पुरवठा ही काळाची गरज आहे. त्यासाठी संबंधित मंत्रालयांकडून युद्धपातळीवर काही ठोस कृती होण्याची  गरज आहे यावर गोयल यांनी भर दिला. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी उच्च उत्पन्न देणाऱ्या कापूस बियाणांशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान आणि उच्च घनता लागवड प्रणाली सारख्या नाविन्यपूर्ण कृषी शास्त्राची ओळख  करून देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. एसआयएमए -सीडीआरएद्वारा विकसित हातात पकडायच्या कापूस तोडणी यंत्राच्या  वापरामुळे  शेतकरी उत्पादकांना मदत होईल. याबाबत गोयल यांनी  कापड उद्योग आणि उद्योग संघटनांनी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. भारतीय वस्त्रोद्योग महासंघ, कापूस महामंडळ लिमिटेडच्या वितरण सहाय्याने युद्धपातळीवर हा प्रकल्प हाती घेईल, असे गोयल म्हणाले. उद्योग संघटना आणि उद्योग नेत्यांनी मिळून हातात पकडायच्या 75 हजार कापूस तोडणी यंत्रासाठी निधी देण्याचे मान्य केले आहे. 
दरम्यान, नवी दिल्लीत यापूर्वी झालेल्या  संवादात्मक बैठकीनंतर सुरु करण्यात आलेल्या कार्यवाहीचा गोयल यांनी यावेळी आढावा घेतला. आयसीएआर -केंद्रीय कापूस संशोधन संस्था – (सीआयसीआर ), नागपूर यांनी शेतकरी जनजागृती कार्यक्रम, एचडीपीएस, उच्च घनता लागवड प्रणाली आणि जागतिक सर्वोत्तम शेती पद्धतींद्वारे कापूस उत्पादकतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी कापूस उत्पादकता वाढवण्याबाबत एक सर्वंकष  योजना सादर केली. सल्लामसलतीच्या माध्यमातून समस्या सोडवण्यासाठी तत्पर आणि व्यावहारिक दृष्टिकोनाबद्दल उद्योग आणि वस्त्रोद्योग मूल्य साखळी भागधारकांनी यावेळी गोयल यांचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या:

Farmers Protest: औरंगाबादेत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचं ‘जलसमाधी’ आंदोलन; थेट उतरले जायकवाडीत
Nandurbar News : नंदूरबार बाजार समितीत ‘ज्वारी’ तेजीत, मिळतोय आत्तापर्यंतचा सर्वाधिक दर, शेतकरी समाधानी 
Vegetables : धुळे बाजार समितीत भाज्यांची आवक वाढली, दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना फटका
Jawahar Chana 24: ‘जवाहर चना 24’ ही नवीन जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, हार्वेस्टरनं करता येणार हरभऱ्याची काढणी
Weather Update : उत्तर भारतात थंडीचा जोर वाढणार, तर ‘या’ राज्यात पावसाचा अंदाज, जाणून घ्या हवामानाचा अंदाज
Sanjay Raut Released : तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut: आलोय बाहेर… आता बघू, आम्ही लढणारे आहोत…; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Released : संजय राऊत तुरुंगा बाहेर, हजारो शिवसैनिकांनी केलं राऊतांचं स्वगत
Sanjay Raut: ठरलं… संजय राऊतांची आजच सुटका होणार, जामिनाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
IPL 2023 Auction: कोचीमध्ये 23 डिसेंबरला होणार आयपीएल 2023 चं ऑक्शन? वर्ल्ड कपनंतर होणार अधिकृत घोषणा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares