Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालांचे 'वॉर' गाणं चाहत्यांच्या भेटीला अल्पावधीतच मिळाले – ABP Majha

Written by

By: अशरफ ढुड्डी | Updated at : 08 Nov 2022 12:43 PM (IST)
Edited By: मंजिरी पोखरकर
Sidhu Moose Wala
Sidhu Moose Wala : दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे ‘वॉर’ (Vaar) हे नवीन गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या यूट्यूब पेजवर हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. एका तासात या गाण्याला दोन मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. 
29 मे 2022 रोजी सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्याचं हे दुसरं गाणं लॉंच करण्यात आलं आहे. हे गाणं महान शीख योद्धा हरिसिंह नलवा यांच्या आयुष्यावर बेतलेलं आहे. हरीसिंह नलवा हे शीख समाजाचे महान सेनापती होते. तसेच ते रणजित सिंह यांचे लष्करप्रमुखदेखील होते. त्यांनी अनेक युद्धे करून महाराज रणजित सिंह यांना विजय मिळवून दिला आहे. 
सिद्धू मुसेवाला यांचे ‘वॉर’ हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. सनेपीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. सिद्धू मुसेवाला यांचं मृत्यूनंतरचं पहिलं गाणं ‘SYL’ यूट्यूबने हटवलं आहे. सरकारने आक्षेप घेल्यामुळे हे गाणं यूट्यूबने हटवलं असल्याचं म्हटलं जात आहे. या गाण्यात शेतकरी आंदोलन, लाल किल्ला आणि पंजाब-हरियाणा अशा अनेक गोष्टींचा उल्लेख होता.
सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर तब्बल 26 दिवसांनी त्यांचे ‘SYL’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. सिद्धू मूसेवालाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. दोन दिवसांतच या गाण्याला 27 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. तर 33 लाख लोकांनी सिद्धूच्या या गाण्याला आपली पसंती दर्शवली होती. सिद्धू मूसेवाला यांचे SYL हे गाणं यूट्यूबवर ट्रेंड करत होतं.  

सिद्धू मुसेवाला यांच्या अरदासच्या वेळी त्यांच्या वडिलांनी सिद्धूला गाण्यांच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवणार असल्याचे सांगितले होते. सिद्धूचे वडील बलकौर सिंह म्हणाले होते की, दर 5-6 महिन्यांनी सिद्धूचे एक गाणं रिलीज करतील, जेणेकरून सिद्धूची सगळी गाणी पुढील 5-7 वर्षे रिलीज होत राहतील आणि ते लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहतील. 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

 
संबंधित बातम्या
Leslie Phillips: हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे निधन; वयाच्या 98 व्या घेतला अखेरचा श्वास
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने आलिया-कतरिनाला टाकलं मागे; इंस्टाग्रामवर पार केला 75 मिलियनचा टप्पा
Nana Patekar : नाना पाटेकरांचं मनोरंजनसृष्टीत कमबॅक; प्रकाश झा यांच्या ‘लाल बत्ती’ सीरिजमधून करणार ओटीटीवर पदार्पण
Happy Birthday Subodh Bhave : कधी लाल्याच्या भूमिकेत ‘एकदम कडक’ एन्ट्री तर कधी ‘बालगंधर्व’; सुबोधचा विक्रांत सरंजामे आजही प्रेक्षकांना घालतो भुरळ
Zee Studio : ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादावर झी स्टुडिओचा खुलासा; म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे…”
Mumbai Local Train Updates: पश्चिम रेल्वेवरील जलद लोकलची वाहतूक विस्कळीत; अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान तांत्रिक बिघाड
Shinde-Fadnavis Government : 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा ठोकणार, शिंदे गटाचा इशारा
2000 Rupees Note : RBI ने मागील तीन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही, RTI मधून माहिती समोर
Jawahar Chana 24: ‘जवाहर चना 24’ ही नवीन जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, हार्वेस्टरनं करता येणार हरभऱ्याची काढणी
Elon Musk: ट्विटरसाठी मस्क यांनी सोडले टेस्लावर पाणी? 4 अब्ज डॉलरच्या शेअर्सची विक्री

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares