उत्पादनवाढसाठी ‘वसाका’ शेतकर्‍यांना देणार खते आणि बियाणे – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
देवळा : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी खत व बेने वाटप करण्याचे नियोजन असून, कराराप्रमाणे कामगारांची थकीत देणी देण्यास मी कटीबद्ध आहे. हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी वसाकाच्या संबंधित सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन धाराशिवचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केले.
धाराशिव साखर कारखाना, युनिट-२ संचालित वसाकाचा गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन व ऊसमोळी पूजन कार्यक्रम रविवारी (दि.६) वसाका कार्यस्थळावर उत्साहात झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अवसायक राजेंद्र देशमुख होते. कारखान्याचे जनरल मॅनेजरकापडणीस यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार शांताराम आहेर, माजी अध्यक्ष शशिकांत पवार, शेतकरी संघटनेचे नेते माधवराव मोरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यकारी संचालक अमर पाटील, संजय खरात, संदीप खारे, आबासाहेब खारे, कृष्णा पाटील उपस्थित होते. योगेश शेवाळे व सुनील तुपे यांच्या हस्ते सपत्निक काटा तसेच, गव्हाण पूजन करण्यात आले.
कामगारांच्या थकीत देणीसंदर्भातील भूमिका वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, विलास सोनवणे, दीपक पवार यांनी कामगारांच्या समस्या पोटतिडकीने मांडली. निवृत्त कामगारांची भविष्यनिर्वाह निधी व ग्रज्युईटी देण्यात यावी, एकरकमी २५०० एफ.आर.पी. ऊसउत्पादक शेतकर्‍यांना देण्यात यावा, तसेच धाराशिव संचालित वसाकाच्या व्यवस्थापक मंडळाने कार्यक्षेत्रात दौरा आयोजित करावा, अशी मागणी वसाका मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी केली.
कारखान्याचे अवसायक राजेंद्र देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, कामगार संघटनेशी झालेल्या त्रिपक्षीय कराराप्रमाणे कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्वतः आग्रही भूमिका मांडत आलो आहे. यावेळी विठेवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी रावसाहेब निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शिरसाठ, लक्ष्मण निकम, पिंटू निकम, माणिक निकम यांनी निवेदन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुबेर जाधव यांनी केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी आभार मानले. यावेळी कारखान्याचे तांत्रिक अधिकारी देसाई, उत्पादन विभाग प्रमुख सूर्यवंशी, सहवीजनिर्मिती प्रमुख संतोष कचोर, मुख्य लेखापाल कोर, मुख्य शेतकी अधिकारी पटेल, साळुंखे, भिवराज सोनवणे, कार्यालय अधीक्षक शेवाळे, बाळासाहेब पवार, रवींद्र सावकार, अरुण सोनवणे, आनंदा देवरे, बापु देशमुख, मुन्ना पवार, सुरक्षा अधिकारी बागूल आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares