गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार – Loksatta

Written by

Loksatta

जंगलात गुरे चारावयास गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने ठार केले. मंगळवारी संध्याकाळी चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रांतर्गत मुरमुरी गावानजीकच्या जंगलात घडलेली ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. दशरथ कुनघाडकर (६७) असे मृताचे नाव आहे. वाघाच्या हल्ल्यात एका गायीचाही मृत्यू झाला.
हेही वाचा >>>अमरावती : शासनाला १ रुपयाची मनिऑर्डर, शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन
कुनघाडकर मंगळवारी घरची गुरे चारावयास जंगलात गेले होते. संध्याकाळी गुरे परत आली. परंतु कुनघाडकर परत आले नाहीत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी रात्री जंगलात शोध घेतला. परंतु कुनघाडकर दिसून आले नाही. त्यानंतर बुधवारी पुन्हा गावकऱ्यांनी शोधाशोध केली असता दुपारच्या सुमारास प्रथम त्यांना एक गाय मृतावस्थेत आढळली. पुढे काही अंतरावरच कुनघाडकर यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी राहुल तांबरे यांनी त्यांचे सहकारी आणि पोलिसांसह घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा केला. कुनघाडा परिसरात वाघाच्या हल्ल्यात एखादा व्यक्ती ठार होण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.
मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares