वीज पडून राजुरा तालुक्यातील युवा शेतकरी ठार – Loksatta

Written by

Loksatta

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील पाचगावजवळील कोडापेगुडा येथे शेतात काम करणाऱ्या दांपत्यावर वीज पडल्याने युवा शेतकरी जागीच ठार झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.
ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजता घडली. मानकू रामू कोडापे (३०) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याची पत्नी जंगूबाई कोडापे ही गंभीर जखमी झाली आहे. तालुक्यात दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. कोडापे दांपत्य शेतात काम करीत असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. त्यात युवा शेतकरी मानकू कोडापे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी गंभीर जखमी असून राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares