Maharashtra News Updates 10 November 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर… – ABP Majha

Written by

By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 10 Nov 2022 08:06 AM (IST)
Nandurbar News : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सफेद मक्याला पतवारीनुसार 2462 ते 2899 पर्यंत दर मिळत आहे तर लाल मक्याला 1600 ते 2000 रुपयांचा दर मिळत आहे. बाजारसमितीत मक्याची आवक वाढली असून दररोज 3000 क्विंटलपेक्षा अधिक मका विक्रीसाठी दाखल होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी नंदुरबार बाजार समितीत लाल आणि सफेद मक्याला विक्रमी दर मिळत असून शेतकरी समाधानी आहेत. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल मक्याची आवक बाजार समितीत होत असून ही आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या वतीने व्यक्त केली जात आहे. परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असे तरी यावर्षी मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. बाजार समितीत मका, सोयाबीन, ज्वारी, लाल मिरची तेजीत असून यातून शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत. मात्र बाजारपेठेत मक्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. आवक वाढली तर काही अंशी दरात कमी जास्त होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
Mumbai News : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अधिकारी वर्गही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आश्वासनानुसार सरकारने अद्याप कार्यवाही न केल्याने राज्यभरातील सरकारी अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना 
काही मागण्यांबाबत अधिकारी वर्गाच्या महासंघाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनही अद्याप मागण्यांवर विचार केला जात नाही
त्यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने  आंदोलनाचा इशारा  दिलाय.
राज्यात सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकारी आहेत.
Sangli Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सांगली जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान आचारसंहितेत अडकले आहे.  अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता दोन महिने पैशांची वाट पाहावी लागणार आहे. आचारसंहितेत अनुदान अडकल्याने शासनाने होणाऱ्या विलंबानबद्दल व्याज देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात पुढील महिन्यात 222 ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्यामुळे या ग्रामपंचायतींवरती प्रशासक नेमण्यात आले होते. राज्यातील 7 हजार 675 ग्रामपंचायतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतीच्या समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांद्वारे 18 डिसेंबर रोजी मतदान तर निकाल 20 डिसेंबर रोजी होणार असल्याचे राज्य स्तरावरुन जाहीर करण्यात आले आहे. 
Satara News : छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड. या प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरी भोवतालच्या अतिक्रमणाबाबत जो काही वाद सुरू होता, त्यावर आज शिंदे सरकारकडून पडदा टाकण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. या अफजलखानाच्या कबरीभोवती जे काही अनधिकृत बांधकाम होतं, ते बांधकाम पोलीस, महसूल विभाग आणि वन विभाग यांच्याकडून ते पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात लावण्यात आलेला असून हा संपूर्ण परिसर पोलिसांनी सिल केला आहे. 
Anil Parab Granted Interim Bail : दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्टचे बांधकाम अपूर्ण असताना कर आकारणीची कार्यवाही करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या माजी मंत्री, आमदार अनिल परब यांना खेड न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 
Ratnagiri Gram Panchayat Election : ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्यामुळे या ग्रामपंचायतींवरती प्रशासक नेमण्यात आले होते.राज्यातील 7 हजार 675 ग्रामपंचायतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतीच्या समावेश आहे.या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांद्वारे 18 डिसेंबर रोजी मतदान तर निकाल 20 डिसेंबर रोजी होणार असल्याचे राज्य स्तरावरून जाहीर करण्यात आले आहे. 
Bharat Jodo Yatra : राज्यात तिसऱ्या दिवशीही भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही यात्रा कृष्नूर ते नांदेड मार्गक्रमण करत असताना बुधवारी राहुल गांधी यांनी शेतकरी, शेतमजूर, बचत गटांच्या महिला, विद्यार्थी यांची भेट घेऊन बातचीत केलीय. दरम्यान या सर्व यात्रेत कुटुंबासह सामील झालेले कोळी बांधवांचे कुटुंब लक्ष वेधून घेत होते. मुंबईहून भारत जोडो यात्रेत दाखल झालेले कोळी बांधवांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या समस्या सांगतल्या. दरम्यान, आज या यात्रेचा चौथा दिवस आहे. राज्यातील भारत जोडो यात्रेच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सहभागी होऊ शकतात. अशातच चौथ्या दिवशी कसा असेल या यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम हे जाणून घेऊ. 
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
Sanjay Raut News : तब्बल 100 दिवसानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची बुधुवारी (9 नोव्हेंबर) तुरुंगातून सुटका झाली. मात्र, या जामिनाला ईडीचा (ED) विरोध कायम आहे. या विरोधात ईडीने उच्च न्यायालयात अपिल केलं आहे. त्यावर न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहे. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.
संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी अशी मागणी करणारी एक याचिका ईडीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. तसेच आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा महाराष्ट्रातील चौथा दिवस असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते सामिल होणार आहेत. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 
संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी
संजय राऊत यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज सकाळी सुनावणी होणार आहे. ऑगस्ट 2022 रोजी संजय राऊतांना त्यांच्या निवास्थानातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 102 दिवसांनी संजय राऊतांना पीएमएलए कोर्टाने जामिन मंजूर केला आहे.
राहुल गांधीच्या महाराष्ट्रातल्या पदयात्रेचा आज चौथा दिवस
राहुल गांधींनी सुरू केलेल्या पदयात्रेचा आज 64 वा आणि महाराष्ट्रातला आज चौथा दिवस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात करतील. दुपारी 4 वाजता देगलूर नाका येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होईल. संध्याकाळी 6 वाजता न्यू मुंडा मैदान येथे राहुल गांधीची सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार आज यात्रेत सहभागी होणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यातील 92 नगरपरिषदांमध्येसुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिकामधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. या प्रकरणाची सुनावणी आज नवे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर 21 व्या क्रमांकावर होणार आहे.
भारत- इंग्लंड सेमिफायनल सामना  
टी 20 विश्व चषकातला आज दुसरा सेमी फायनल सामना भारत आणि इग्लंड दरम्यान होणार आहे. आज जर भारत जिंकला तर विश्व चषकाच्या अंतिम फेरीत भारत पोहोचणार असून त्याचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.
Rahul Gandhi : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जातायेत कारण…वाचा नेमकं काय म्हणाले राहुल गांधी
Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरांत सातत्यानं घसरण, तेल कंपन्यांकडून मात्र दिलासा कायम! जाणून घ्या, आजचे नवे दर
Twitter Official Label : ट्विटरवर नवीन ‘Official’ लेबल, काही वेळानंतर हटवला, काय आहे कारण?
अॅडलेडच्या मैदानात रंगणार सेमीफायनलची लढत, भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यावेळी कशी असेल मैदानाची स्थिती?
Sania Shoaib Divorce : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट, 12 वर्षांच्या सुखी संसारानंतर काडीमोड

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares