Maize Price : नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर, गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा – ABP Majha

Written by

By: भिकेश पाटील, एबीपी माझा | Updated at : 10 Nov 2022 08:31 AM (IST)
Edited By: गणेश लटके
Maize Price Hike
Maize Price Hike : सध्या मका उत्पादक शेतकरी (Farmers) समाधानी असल्याचे चित्र दिसत आहे. कारण मक्याची दरात वाढ झाली आहे. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nandurbar Agriculture Market Committee) सफेद मक्याला विक्रमी दर (Maize Price Hike) मिळाला आहे. पतवारीनुसार मक्याला 2 हजार 462 ते 2 हजार 899 पर्यंत दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. सध्या नंदूरबार बाजार समितीत मक्याची आवक वाढली असून, दररोज 3 हजार क्विंटलपेक्षा अधिक मका विक्रीसाठी दाखल होत आहे. 
गेल्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी नंदूरबार बाजार समितीत लाल आणि सफेद मक्याला विक्रमी दर मिळत असून शेतकरी समाधानी आहे. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल मक्याची आवक बाजार समितीत होत आहे. मक्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या वतीनं व्यक्त केली जात आहे. परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात आहेत. अशातच काही शेतकऱ्यांची पिकं या पावसाच्या फटक्यातून वाचली आहेत. त्यांच्या पिकांना चांगला दर मिळत असल्यानं थोडाफार तरी दिलासा शेतकऱ्यांना मिळत आहे. 
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मका, सोयाबीन, ज्वारी, लाल मिरची तेजीत आहे. या पिकांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. बाजारपेठेत मक्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. मक्याची आवक वाढली तर काही अंशी दर कमी जास्त होण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात लागवड करण्यात आलेला कांदा परतीच्या पावसामुळं खराब झाला होता. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याची लागवड नंदूरबार तालुक्यात होत असते. रब्बी हंगामात नंदूरबार तालुक्यात 2 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड होत असते. मात्र, या वर्षी कांद्याचा बेल्ट म्हणून ओळख असलेल्या पूर्व पट्ट्यात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं विहिरींना पाणी नसल्यानं, तसेच  विजेची समस्या आणि खरीप हंगामात बसलेला नुकसानीचा तडाखा यामुळे जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात कांदा पिकाचे क्षेत्र 1 हजार हेक्टरनं कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर्षी 1 हजार 500 हेक्टरवर कांद्याची लागवड होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कांद्याचे लागवड क्षेत्र कमी झाल्याने येणाऱ्या काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Reels
महत्त्वाच्या बातम्या:
Aurangabad: कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याकडून पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन
Beed : बीड जिल्ह्यात तुरीवर मर रोगासह पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Aurangabad: कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात लम्पीचा कहर, जिल्ह्यात सर्वाधिक जनावरे सिल्लोड तालुक्यात दगावली
Agriculture News : मिरचीच्या कीड व्यवस्थापनासाठी युवा शेतकऱ्यानं शोधली भन्नाट आयडिया, शेतकऱ्यांसाठी वरदान, वाचा नेमकं काय केलं संशोधन?
Grampachayat Election : ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचा शेतकऱ्यांना फटका, अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना पाहावी लागणार वाट
Jagdamba Sword: शिवरायांची जगदंबा तलवार 2024 पर्यंत ब्रिटनमधून परत आणणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
Jagdamba Talwar in Maharashtra : जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार, Mungantiwar यांची माहिती
IND vs ENG: भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाची पाच कारणं
Bhima Koregaon case: भीमा कोरेगाव प्रकरण: सुप्रीम कोर्टाकडून नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्याची अटींसह परवानगी, तुरुंगातून होणार सुटका
Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2022 | गुरुवार

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares