आंदोलनाचा फटका: अडत्यांच्या अचानक बाजार बंद मुळे तब्बल 10 कोटींचे व्यवहार ठप्प! – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एका अडत्याच्या दुकानात दीड लाखांची रक्कम चोरीस गेली. या रकमेची भरपाई मिळण्यासह इतर मागण्यांसाठी अडते असोसिएशनने सोमवारी (दि. ७) सकाळी साडेअकरा वाजेपासून अचानक आंदोलन सुरू केले. दुसरीकडे शेतकरी सकाळपासूनच माल विक्रीसाठी बाजारात पोहोचले होते. सुमारे दोन ते तीन तास व्यवहार सुरू न झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. यामुळे काही वेळ वातावरण चांगलेच तापले होते.
बाजार समिती प्रशासनाने संबधित अडत्याला दीड लाखांचा धनादेश दिला. त्यानंतर व्यवहार सुरू झाल्याची घोषणा झाली मात्र, तोपर्यंत अनेक कामगार बाजारातून निघून गेले होते. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज सोमवारी बंद असल्यासारखेच होते. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून, अनेक शेतकऱ्यांना माल बाजारात सोडून घरी परतावे लागले. या कारणाने दिवसभरात सुमारे १० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. सद्य:स्थितीत
मजुरांना द्यायलाही पैसे नाहीत
सोयाबीन विक्री करुन मजुरांना पैसे द्यायचे होते. म्हणून १२ पोते सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले मात्र, अडत्यांनी अचानक बाजार बंद केला. ज्यावेळी अडते कामावर आलेत. त्यापूर्वी कामगार निघून गेले. त्यामुळे बाजार बंद राहीला. मी शेवटी अडत्याकडे माल ठेवून घरी निघून आलो. त्यामुळे आज मजूरांना पैसेसुद्धा देऊ शकलो नाही.अक्षय ठाकरे,शेतकरी, सालोरा (बु.)
शेतकऱ्यांसाठी कधीच मार्केट बंद नाही
अडत्याच्या दुकानात चोरी झाल्यामुळे अचानक बाजार बंद झाला आणि व्यवहार थांबले. अडत्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पण आम्ही माल घेऊन गेलो, आमच्या मालाला किंवा आम्हाला काहीच किंमत नाही का? शेतकऱ्यांसाठी कधीच बाजार बंद होत नाही. . आम्ही १५ पोते सोयाबीन विक्रीसाठी नेले होते, ते बाजारात सोडून घरी यावे लागले. उमेश वाकोडे, शेतकरी, साऊर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares