यवतमाळच्या शेतकरी पुत्राने तयार केली स्वयंचलित ‘सोनिक कार’ 150 रुपयात 250 KM धावणार – ABP Majha

Written by

यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येसाठी ओळखला जातो. याच जिल्ह्यातील शेतकरी पुत्र हर्षल नक्षणे भन्नाट कल्पनेतून स्वयंचलित हायड्रोजनिक कार बनवली आहे.
फक्त 150 रुपयात 250 किलो मीटरचा प्रवास करता येणार आहे.
सध्याच्या काळात वाहन वापरणा-यांची संख्या वाढली असून, दररोज हजारो वाहने रस्त्यावरून धावत आहेत. तसेच पेट्रोल व डिजेलचे (petrol diesel price) दर 120 रुपयावर पोहचले आहेत.
यावर उपाय म्हणून यवतमाळमधील वणी येथील हर्षल नक्षणे नावाच्या युवकाने आपल्या कुणाल आसुटकर नावाच्या मित्राच्या मदतीने अफलातून अशी प्रदुषण मुक्त स्वयंचित ‘सोनिक कार’ तयार केली आहे. या कारची यवतमाळ जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.
हर्षल नक्षणे याने एम टेक पर्यंत शिक्षण घेतले आहे. या युवकाचे एक स्वप्न होते की, भारताकडे स्वत:ची कार धावण्यासाठी सक्षम असली पाहिजे. परवडणाऱ्या किमतीत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा वापरणे आणि अपघात आणि मानवी चुका कमी होईल अशी कार हवी.
त्या दृष्टीकोणातून हर्षल नक्षणे याने एक नावाने कंपनी रजिस्टर केली आहे. कुणाल आसुटकर या विज्ञान शाखेत भाग तीन येथे शिक्षण घेत असलेल्या बालपणीच्या मित्राच्या मदतीने कार बनविण्याचे काम सुरु केले.
गेल्या काही दिवसापूर्वीच ही कार तयार झाली आहे. हायट्रोजन गॅसवर चालविणारी ही कार आहे. सेल्फ ड्रायव्हींगसाठी संगणक तयार केले आहे.
एक लिटर हायट्रोजन (किंमत 150 रुपये) मध्ये 250 किलो मिटर ही कार धावणार आहे. त्यामुळे पेट्रोल व डिजेलवर चालणा-या वाहना पासून सुटका होणार आहे.
फक्त कारसाठी लागणारे काच व टायर ह्या वस्तू अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आले. प्रायोगिक तत्वावर ही कार तयार कली असून, त्यासाठी त्याला तब्बल 25 लाख रुपये खर्च आला आहे.
इंटरनेट सेवा पुरविण्याच्या व्यवसायातून मिळविलेल्या पैशातून ही कार बनविल्याची माहिती हर्षल नक्षणे यांनी दिली. सेल्फ ड्रायव्हींग व हायट्रोजन फ्युल सिंसटमचे पॅटेट नोंदणी केली आहे. 100 कार तयार झाल्यानंतर ही कार विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.
दिवाळीत गायींना चटईवर बसवण्याची स्पर्धा; ग्रामीण भागातील अनोखी प्रथा
Yavatmal : एक नंबर! यवतमाळच्या शेतकऱ्याच्याची कंपनी फोर्ब्सच्या यादीत
Maharashtra Politics: राष्ट्र्वादी काँग्रेसने जादूटोणा करून उद्धव ठाकरेंना आपल्या जाळ्यात ओढलं; बावनकुळे यांच वक्तव्य
Rajiv Gandhi Case: राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनी, रविचंद्रनसह सर्व सहा दोषींच्या सुटकेचे निर्देश
Beed News : बीड-माजलगावमध्ये दीड महिन्याच्या बाळाला मुदतबाह्य डोस, डॉक्टरविरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल
Ajit Pawar On Sharad Pawar : कॅन्सर झाल्यावर पवार डॉक्टरांना म्हणाले होते, तुम्हाला पोहोचवून मी जाणार, अजित पवारांनी किस्सा सांगितला
Sushma Andhare Meets Sanjay Raut : फडणवीसांना वर्कलोड, गृहमंत्रीपद झेपत नाही; राऊतांच्या भेटीनंतर सुषमा अंधारे बरसल्या, सोमय्यांवरही हल्लाबोल

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares