शिवप्रेमींतर्फे बांद्यात आनंदोत्सव साजरा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
swt1040.jpg
61605
बांदाः कट्टा कॉर्नर येथे फटाके फोडून आनंद व्यक्त करताना शिवप्रेमी.
शिवप्रेमींतर्फे बांद्यात आनंदोत्सव साजरा
बांदाः प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीजवळील अवैध बांधकाम तोडण्यात आले. या कारवाईमुळे आज बांदा येथील कट्टा कॉर्नर सर्कलजवळ फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र राज्यातील शिवप्रेमी, हिंदू संघटनांनी या कबरीच्या उदात्तीकरणाच्या विरोधात न्यायालयीन स्तरावर प्रयत्न केले होते. याच प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. या सोबत तेलंगणा राज्यातील कारागृहात कारवाई अंतर्गत बंदिस्त असलेले हिंदुत्ववादी आमदार टायगर राजा सिंह यांच्या सुटकेचाही आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी बाबा काणेकर, नीलेश सावंत, स्वागत नाटेकर, सुनील राऊळ, सर्वेश गोवेकर, संदेश सावंत, भैय्या केसरकर, रत्नाकर आगलावे, नंदू पिळणकर, युवराज हरमलकर, भैय्या सावंत आदी उपस्थित होते.
…………
swt1041.jpg
61606
ऋषिकेश पाटील
ऋषिकेश पाटीलला ‘लाडली’ पुरस्कार
सावंतवाड, ता. 10ः सावंतवाडीचे सुपुत्र ऋषिकेश पाटील यांना उत्कृष्ट व संवेदनशील पत्रकारितेसाठी महत्त्वाचा 12 वा ‘लाडली मिडिया अँड अडव्हर्टायझिंग अवार्ड फॉर जेंडर सेन्सिव्हीटी’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड यांनी पुरस्कृत केला होता. हा कार्यक्रम हैदराबाद येथे विश्व विद्यालयाच्या सभागृहात पार पडला. ऋषिकेश सध्या इन्डी जर्नलला फ्री लान्स पत्रकारिता करतो. ‘हिंदू’चे संस्थापक पी. साईनाथ यांच्या वेब पोर्टलला लेखन केले आहे. त्याने कोयना परिसर भूस्खलन झालेला भाग, कोल्हापूर पूरग्रस्त भाग तसेच दिल्लीचे शेतकरी आंदोलन येथे प्रत्यक्ष काम करून रिपोर्ट केले आहेत. किसान आंदोलनात जाताना आदिवासी महिलांसोबत प्रवास करत आदिवासी महिला शेतमजूर कस्तुरबा सरोले यांच्या जीवनावर ‘इंडी जर्नल’ या पोर्टलसाठी स्टोरी लिहिली. त्यासाठीच हा पुरस्कार मिळाला आहे. ऋषिकेश हा अभिनेते नंदू पाटील आणि डॉ. विजयालक्ष्मी चिंडक-पाटील यांचा सुपुत्र आहे.
……………….
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares