Farmers Agitation : महसूलमंत्री विखे पाटलांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा, – ABP Majha

Written by

By: नितीन ओझा, एबीपी माझा | Updated at : 11 Nov 2022 01:57 PM (IST)
Edited By: गणेश लटके
Farmers Agitation
Farmers Agitation : विविध मागण्यांवरुन अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शेतकरी (Farmers) आक्रमक झाले आहेत. आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या‌ मतदारसंघात शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढत तहसीलसमोर ठिय्या आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी बैलजोडी, शेळ्या घेऊन तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.  
राहाता हा राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ आहे. मंत्र्याच्या मतदारसंघातील शेतकरीच विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत शासकीय मदत मिळावी, तसेच पिकविमा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हा बिऱ्हाड मोर्चा काढला. तसेच तहसीलसमोर ठिय्या आंदोलनही केलं. यावेळी शेतकरी बैलजोडी, शेळ्या बरोबर घेऊन आले होते. तहसील कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोरच बिऱ्हाड मांडत चूल थाटली. राजकीय वक्तव्यात व्यस्त असलेल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष‌ द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.


यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांच्यावर देखील टीका केली. शासनाने आम्हाला जास्त वाट बघायला लावू नये असी विनंती देखील यावेळी शेतकऱ्यांनी केली. तसेच या आंदोलनात ज्या विविध संघटनांचे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहिले, त्यांचेही शेतकऱ्यांनी यावेळी आभार मानले.

Reels


यावर्षी राज्याच्या बहुतांशी भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. या पावसाचा शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. या अतिवृष्टीच्या फटक्यातून काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. आता ती पिकं देखील संकटात सापडली आहेत. अनेक ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. ऑक्टोबर महिन्यात देखील परतीच्या पावसानं काही जिल्ह्यांमध्ये पावसानं थैमान घातलं होतं. यामुळं देखील शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली होती. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फटका बसला आहे. यातून देखील काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहे. या पिकांवर आता रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. 
महत्त्वाच्या बातम्या:
Bhandra : भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव, मजुरीही निघण्याची शक्यता नाही, चार एकरातील पीक शेतकऱ्यानं पेटवलं
Dragon Fruit : सातपुड्याच्या पायथ्याशी ‘ड्रॅगन फ्रूट’चा मळा, आत्तापर्यंत 15 लाखांचं उत्पन्न, आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय
GM Crop oil : GM पिकांच्या वापरामुळं भारत खाद्यतेलात आत्मनिर्भर होईल, या पिकांना विरोध केल्यास शेतकऱ्यांसह उद्योगांचे नुकसान, सर्वोच्च न्यायालयात सरकारनं मांडली बाजू
Narendra Singh Tomar : कृषी जैवविविधता जतन करण्यासाठी नैसर्गिक आणि पर्यावरणीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज : कृषीमंत्री
Farmers News : भूसंपादन न करताच पैठण-पंढरपूर पालखी महामार्गाचं काम सुरु, अद्याप मोबदला मिळाला नाही, शेतकऱ्यांचा आरोप 
गजानन कीर्तिकरांनी साथ सोडली पण मुलगा अमोल कीर्तिकर मात्र ठाकरेंसोबतच!
नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ‘मित्र’ संस्थेची स्थापना होणार, सरकारची मंजुरी
Maharashtra Politics : मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती गजानन किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश
Nashik : नाशिकमध्ये जिल्हा परिषदेकडून 100 ‘मॉडेल स्कूल’; काय असणार खास…
Gujarat Election: पंतप्रधान मोदी, गडकरी, फडणवीस यांच्यासह गुजरातमध्ये भाजपचे 40 स्टार प्रचारक

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares