Solapur : शेतकऱ्यांना नामर्द म्हटल्याने संजय कोकाटेंनी माफी मागावी ; संजय पाटील – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
टेंभुर्णी : टेंभुर्णी येथील रास्तारोको आंदोलनावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संजय कोकाटे यांनी आंदोलनास शेतकरी प्रतिसाद देत नसल्याने शेतकरी नामर्द आहेत, असा उल्लेख भाषणामध्ये केला आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांचा अपमान झाला असल्याने संजय कोकाटे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती संजय पाटील भीमानगरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
या आंदोलनावेळी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर खालच्या भाषेत टिका करण्यात आली होती. यासंदर्भात संजय पाटील भीमानगरकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, ब्रम्हदेव मस्के, शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दीपक पाटील, कांतीलाल नवले, संजय मिस्कीन, नरहरी नांगरे, सुनिल मिस्कीन गणेश पाटील आदी उपस्थित होते.
संजय पाटील भीमानगरकर म्हणाले, साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणारे सर्व शेतकरी आहेत. महागाई, दुष्काळासारख्या संकटांमुळे शेतकरी अडचणीत असून शेतकरी कर्ज काढून वाहने घेऊन ऊस वाहतूक करीत आहेत. बारा टनाच्यावर ऊस वाहतूक केली तर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन केले ते योग्य नाही. शेतकऱ्यांच्या जोडधंद्याला खीळ घालण्याचे व वाहतूकदारांची अडवणूक करून त्यांना आर्थिक अडचणीत आणण्याचे काम कोणी करीत असेर तर त्याविरोधात आंदोलन करण्यात येईल.
सर्व साखर कारखानदारांनी वर्गणी करून आरटीओना एक कोटी रूपये दिल्याचा आरोप केला तो सिध्द करून दाखवा. ‘विठ्ठलराव शिंदे’ ने २ हजार ६०४ रूपये तर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने २ हजार ६२२ रूपये दर दिला आहे. एफआरपीनुसार उसाला दर दिला असताना कारखान्याची बदनामी करू नये, असेही ते म्हणाले, गेली तीस वर्षे आमदार बबनराव शिंदेंच्या माध्यमातून माढा तालुक्याचा विकास झाला असून त्यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे. संजय कोकाटे यांनी प्रथम पंचायत समिती लढवून विजय मिळवून दाखविण्याचे जाहीर आव्हानही संजय पाटील भीमानगरकर यांनी दिले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares