‘महाडीबीटी’ सर्व्हर समस्या; शेतकऱ्यांचे ‘कृषी’ला निवेदन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
‘महाडीबीटी’ सर्व्हर समस्या;
शेतकऱ्यांचे ‘कृषी’ला निवेदन
वेंगुर्ले ः कृषी विभागाचा महाडीबीटी सर्व्हर गेले १० ते १५ दिवस बंद असल्याने अवजारांसाठी सोडत पद्धतीने निवड झालेल्या तुळस, होडावडा, पंचक्रेशीतील शेतकऱ्यांना मुदतीत कागदपत्रे अपलोड करण्यात अडचण निर्माण होत आहे. ही समस्या त्वरित दूर करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आंबा व काजू शेतकरी संघाटक श्यासुंदर राय, महादेव दळवी, सुधीर परब आदी शेतकऱ्यांनी येथील कृषी अधिकारी हर्षा गुंड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ज्या शेतकर्‍यांची सोडत पद्धतीने निवड झाली आहे, त्यांनी सात दिवसांच्या आत आपली कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे; मात्र सर्व्हर बंद असल्याने ती करता येत नाही. त्यामुळे मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी होत आहे.
————-
हिंदळेत १५ पासून धार्मिक कार्यक्रम
देवगड ः हिंदळेचे ग्रामदैवत श्री काळभैरव जयंती उत्साहनिमित्त १५ व १६ नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १५ ला सकाळपासून लघुरुद्र जप, रात्री कलारंग संगीत रजनी हिंदळे यांचा भावगीत, भक्तिगीत, नाट्यसंगीत कार्यक्रम, १६ ला सकाळी लघुरुद्र स्वाहाकार, दुपारी महाप्रसाद, दुपारपासून स्थानिक भजने, रात्री श्रेयश बडवे आणि मानसी बडवे (पुणे) यांची कीर्तन जुगलबंदी (साथसंगत-हर्षल काटधरे, तबला-सोहम जोशी), १९ ते २४ या कालावधीत मंदिरात देव दीपावली वार्षिक उत्सव होणार आहे. यानिमित्त सायंकाळी डाळप, रात्री पुराण वाचन, पालखी व त्यानंतर नीलेश पाटकर यांचे कीर्तन, २४ ला दर्शन व ओटी भरणे कार्यक्रम, सायंकाळी उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी या दोन्ही उत्सवांना उपस्थित राहावे, असे आवाहन काळभैरव मंदिर व्यवस्थापन व हिंदळे ग्रामस्थांनी केले आहे.
———–
पालव, गुडेकरांची ‘मातोश्री’ला भेट
कणकवली ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख नीलम पालव आणि कणकवली तालुका महिला संघटक वैदेही गुडेकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील महिला आघाडीच्या संघटनात्मक कामकाजाची चौकशी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात पक्ष संघटना बळकटीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares