यवतमाळच्या शेतकरी पुत्राचा नाद खुळा, तयार केली स्वयंचलित ‘सोनिक कार’ 150 रुपयात – ABP Majha

Written by

By: निलेश फाळके | Updated at : 01 Oct 2022 08:48 PM (IST)
Edited By: नामदेव कुंभार
yavatmal
Yavatmal Success story : यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येसाठी ओळखला जातो. याच जिल्ह्यातील शेतकरी पुत्र हर्षल नक्षणे भन्नाट कल्पनेतून स्वयंचलित हायड्रोजनिक कार बनवली आहे. फक्त 150 रुपयात 250 किलो मीटरचा प्रवास करता येणार आहे. सध्याच्या काळात वाहन वापरणा-यांची संख्या वाढली असून, दररोज हजारो वाहने रस्त्यावरून धावत आहेत. तसेच पेट्रोल व डिजेलचे (petrol diesel price) दर 120 रुपयावर पोहचले आहेत. यावर उपाय म्हणून यवतमाळमधील वणी येथील हर्षल नक्षणे नावाच्या युवकाने आपल्या कुणाल आसुटकर नावाच्या मित्राच्या मदतीने अफलातून अशी प्रदुषण मुक्त स्वयंचित ‘सोनिक कार’ तयार केली आहे. या कारची यवतमाळ जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.   
हर्षल नक्षणे याने एम टेक पर्यंत शिक्षण घेतले आहे. या युवकाचे एक स्वप्न होते की, भारताकडे स्वत:ची कार धावण्यासाठी सक्षम असली पाहिजे. परवडणाऱ्या किमतीत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा वापरणे आणि अपघात आणि मानवी चुका कमी होईल अशी कार हवी. त्या दृष्टीकोणातून हर्षल नक्षणे याने एक नावाने कंपनी रजिस्टर केली आहे. कुणाल आसुटकर या विज्ञान शाखेत भाग तीन येथे शिक्षण घेत असलेल्या बालपणीच्या मित्राच्या मदतीने  कार बनविण्याचे काम सुरु केले. गेल्या काही दिवसापूर्वीच ही कार तयार झाली आहे. हायट्रोजन गॅसवर चालविणारी ही कार आहे. सेल्फ ड्रायव्हींगसाठी संगणक तयार केले आहे. 
एक लिटर हायट्रोजन (किंमत 150 रुपये) मध्ये 250 किलो मिटर ही कार धावणार आहे. त्यामुळे पेट्रोल व डिजेलवर चालणा-या वाहना पासून सुटका होणार आहे. फक्त कारसाठी लागणारे काच व टायर ह्या वस्तू अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आले. प्रायोगिक तत्वावर ही कार तयार कली असून, त्यासाठी त्याला तब्बल 25 लाख रुपये खर्च आला आहे. इंटरनेट सेवा पुरविण्याच्या व्यवसायातून मिळविलेल्या पैशातून ही कार बनविल्याची माहिती हर्षल नक्षणे यांनी दिली. सेल्फ ड्रायव्हींग व हायट्रोजन फ्युल सिंसटमचे पॅटेट नोंदणी केली आहे. 100 कार तयार झाल्यानंतर ही कार  विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. 

Reels
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची जागा शिंदे गटाच्या दसरा मेळावा पार्किंगसाठी, विद्यार्थी संघटनांचा जोरदार विरोध
उद्धव ठाकरे यांना 1996 सालीच मुख्यमंत्री व्हायचं होतं, बाळासाहेबांचीही भेट घेतली; सुरेश नवले यांचा गौप्यस्फोट

Chitra Wagh : ‘त्या’ प्रकरणाचे मुख्य कर्णधार संजय राठोडच; माझी लढाई अजून संपलेली नाही: चित्रा वाघ
तुमच्या आरोपांमुळे संजय राठोडांचं करिअर बर्बाद झालं का?,  प्रश्न विचारताच चित्रा वाघ प्रचंड भडकल्या
Nana Patole : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नसून गुजरातचे मुख्यमंत्री, नाना पटोलेंचा टोला
Bharat Jodo Yatra: देशाची फाळणी करणारे आज भारत जोडो यात्रा काढतायत; मनसेची खोचक टीका
Farmers suicide : परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर, यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Bharat Jodo : राज्यातील 250हून अधिक लेखकांचा भारत जोडोला पाठिंबा; राहुल गांधींकडे पत्राद्वारे केल्या या मागण्या…
Himachal Election: हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या मतदानाचा उत्साह, 70 टक्क्यांहून अधिक मतदान, निकाल 8 डिसेंबर रोजी
काळजी घ्या… मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती! केंद्रीय पथकाकडून सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठिकाणी पाहणी
मुलांनी विचारलं गोडात काय आवडतं? फडणवीस म्हणाले, ‘पहिलंच सांगतो पुरणपोळी आवडत नाही…’ अन् एकच हशा
Earthquake Delhi NCR : दिल्ली-एनसीआर, उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के, आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंप

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares