सरकार, कारखानदारांवर संघटित दबाव हवा, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
शनिवार १२ नोव्हेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 12:37 PM2022-11-12T12:37:45+5:302022-11-12T12:38:20+5:30
समडोळी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने केली. यात काही प्रमाणात यश आले असले तरी निश्चित ऊसदर, हमीभाव, एफआरपी रक्कम, थकीत बिले, पहिली उचल व काटमारीसह अन्य समस्या सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार, साखर कारखानदारांवर संघटितपणे दबाव आणणे अपरिहार्य बनले आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

समडोळी (ता. मिरज) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सुभाष मगदूम, माणिक खोत, कासीम मुजावर, पायगोडा ढोले, प्रा. बी. एस चव्हाण, संदीप आडमुठे, पोपटराव मोरे प्रमुख उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले की, गतवर्षी राज्यात १३ कोटी २० लाख टन उसाचे उत्पादन निघाले. यातही दराच्या बाबतीत कपात करून साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली. याबाबत साखर कारखानदारांना जाब विचारावा लागेल. यामुळे संघटनेच्या पाठीशी राहूनच आपण आपला न्याय हक्क पदरात पाडून घ्यावा.

युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बेले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आम्ही आजवर ताकद देण्याचे काम केले आहे. नेते मंडळींनीदेखील आम्हाला वाऱ्यावर सोडू नये असे मत मांडले.

महेश खराडे म्हणाले, ऊस दरामध्ये खोडा घालण्याचे काम राज्याचे माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्यांनी केले आहे. शेतकरी हितापेक्षा सुडाचे राजकारण हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीतही कारखान्यास चांगला दर देण्यास आम्ही भाग पडू.

यावेळी पोपटराव मोरे, प्रा. बी. एस. चव्हाण, प्रफुल्ल मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. महावीर बिरनाळे यांनी आभार मानले.
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares