Abdul Sattar : आठ दिवसांत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार – अब्दुल सत्तार – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 19 Aug 2022 09:04 PM (IST)
Edited By: नामदेव कुंभार
abdul sattar
Abdul Sattar : येत्या आठ दिवसांत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. ते यवतमाळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेणं महत्त्वाचे आहे. 
अमरावती येथे बोलताना कृषी मंत्री म्हणाले की, ‘आत्महत्या झाल्यावर मदत देण्यापेक्षा आत्महत्या होऊच नयेत, यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषिमंत्री म्हणून मी स्वतः आमच्या कृषी विभागाचे अधिकारी, आयुक्त, जिल्हाधिकारी आम्ही सर्व जण येणाऱ्या काळात एक दिवस शेतकरी आणि त्याच्या परिवारासोबत घालवणार आहेत. ‘
अतिवृष्टीमुळे या वर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांना चांगलाच फटका बसला. शेतकऱ्याच्या शेतातील कापूस,  सोयाबीन  पीक उधवास्त झाले. शेतात तीन ते चार फूट पाणी साचले होते. एवढेच नव्हे तर शेकडो हेक्टर जमीन पूर्ण पने खरडून गेली. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हदबल झाला. नुकसान झाल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.  या खचलेल्या शेतकऱ्यांची जमिनीची आज कृषी मंत्री अब्दुल सत्तर यांनी पाहणी केली. झालेल्या नुकसान त्यांच्याही लक्षात आले. मात्र या नुकसान अहवाल  नेमका  कसा तयार केला जातो यावर शेतकऱ्याला दिली जाणारी मदत अवलंबून राहणार आहे. 
यवतमाळ येथेही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची नुकासानीची पाहणी –  
जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील वणी, राळेगाव, कळंब, बाभूळगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री अब्दुल सत्तार  यांनी झाडगाव येथील शेतकऱ्याच्या शेताची पाहणी केली. यावेळी त्यांनी अभिमान बोभाटे यांच्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाऊन घेतल्या. यावेळी कृषी व महसूल अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नका असे निर्देश दिले. यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख 17 हजार हेक्टर शेत पिकांचे नुकसान झाले. तर पुरामुळे तीन हजार 11 हेक्टर जमीन खरडून गेली आहे.  

Reels
आणखी वाचा :
सात दिवसांत नागपूर विभागाचा पीक नुकसानीचा अहवाल सादर करा, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे आयुक्तांना निर्देश
कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर! शेती करणार आणि शिकणार; प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस, नवीन योजना आणणार : अब्दुल सत्तार 
Coarse Grain Export : अमेरिका आणि ब्रिटनसह भारत ‘या’ देशांना करणार भरड धान्यांची निर्यात 
Wheat Farming : यंदा गव्हाची विक्रमी लागवड, मागील वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी क्षेत्र वाढलं, कृषी मंत्रालयाची माहिती
Sugarcane News : साखर आयुक्तांकडून ऊस तोडणीसह वाहतूक खर्च जाहीर, अधिक पैसे घेणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार
Farmers Agitation : महसूलमंत्री विखे पाटलांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा, तहसीलसमोर मांडला ठिय्या
Bhandra : भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव, मजुरीही निघण्याची शक्यता नाही, चार एकरातील पीक शेतकऱ्यानं पेटवलं
Bharat Jodo : राज्यातील 250हून अधिक लेखकांचा भारत जोडोला पाठिंबा; राहुल गांधींकडे पत्राद्वारे केल्या या मागण्या…
Himachal Election: हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या मतदानाचा उत्साह, 70 टक्क्यांहून अधिक मतदान, निकाल 8 डिसेंबर रोजी
काळजी घ्या… मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती! केंद्रीय पथकाकडून सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठिकाणी पाहणी
मुलांनी विचारलं गोडात काय आवडतं? फडणवीस म्हणाले, ‘पहिलंच सांगतो पुरणपोळी आवडत नाही…’ अन् एकच हशा
Earthquake Delhi NCR : दिल्ली-एनसीआर, उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के, आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंप

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares