प्रहारचा जल्लोष – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय
निर्णयाचे शिरोळला स्वागत
शिरोळ ता. १३ : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी , केलेल्या पाठपुरावामुळे, दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीता, स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालयाबाबत निर्देश दिले आहेत. यामुळे शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात शासनाच्या स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय निर्णयाचे ''प्रहार'' जनशक्ती पक्षाकडून जल्लोषी स्वागत करून साखर पेढे व लाडूचे वाटप करण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष जयराज कोळी म्हणाले,बच्चूभाऊ कडूं यानी असंख्य प्रश्नांसाठी अनोख्या पद्धतीने आक्रमक आंदोलन करून ते यशस्वी केलेली आहेत. शेतकरी, कष्टकरी, निराधार व दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाच्या प्रश्नांवर लढा देत असून बच्चुभाऊ यांच्यामुळेच भारतात प्रथमच दिव्यांगांचे मंत्रालय होत आहे. शासनाने निर्णय घेतलेल्या भूमिकेचे अभिनंदन करतो. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री दगडू माने, जिल्हा युवक संघटक अनिस मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कामगार विभाग प्रमुख समाधान हेगडकर, कोल्हापूर शहर युवक सचिव नरेन उबाळे, प्रहारचे प्रसिद्धीप्रमुख विकास गायकवाड, सरिता शेवाळे, विनायक शेवाळे, नजीर नदाफ, अनिल देशमुख, राजेंद्र प्रधान यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares