वीज कंपनीविरोधात आंदोलनाचा इशारा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
वीज कंपनीविरोधात आंदोलनाचा इशारा
कबनूर, ता. १३ ः रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी राज्य शासनाने जबाबदारी घेऊन दिवसा बारा तास वीजपुरवठा करावा, अन्यथा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व शासनाविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार कोले यांनी निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हटले आहे की, अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. हातातोंडाला आलेली पिके उभ्या पावसात भिजून-कुजून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कर्जे काढून खरीप हंगामाची तयारी केली होती. अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेलेला आहे. शेतकरी रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेण्यासाठी धडपडत आहे. विजेअभावी पाणी नाही, म्हणून पिकांचं नुकसान होत आहे. निसर्गाचा प्रकोप, रात्री शेतीला पाणी देत असताना निर्माण होणाऱ्या अडचणी यांचा गांभीर्याने विचार करून रब्बी हंगामातील नुकसान टाळण्यासाठी दिवसा बारा तास विनाखंडित वीज पुरवठा करण्याची अंमलबजावणी महावितरण कंपनीमार्फत ताबडतोब करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares