Dragon Fruit : सातपुड्याच्या पायथ्याशी 'ड्रॅगन फ्रूट'चा मळा, आत्तापर्यंत 15 लाखांचं उत्पन्न, – ABP Majha

Written by

By: भिकेश पाटील | Updated at : 11 Nov 2022 10:49 AM (IST)
Edited By: गणेश लटके
Dragon Fruit
Dragon Fruit : शेतकऱ्यांसमोर (Farmers) सातत्यानं वेगवेगळी संकट येतात. कधी अस्मानी तर कधी सुलतानी. मात्र, या संकटाचा सामना करत शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतही चांगले प्रयोग करत आहेत. पारंपारिक शेतीला बगल देत शेतकरी नव नवीन प्रयोग करत असल्याचे दिसत आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील  शहादा येथील शेतकरी राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी ‘ड्रॅगन फ्रूट’च्या  (Dragon Fruit) लागवडीचा  यशस्वी प्रयोग केलाय. कमी पाण्यात फायदेशीर होणारी ही शेती आहे. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीच्या माध्यमातून राजेश पाटील यांनी आदिवासी भागातील शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय उभा केला आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी पारंपरिक शेतीला फाटा देत राजेश पाटील या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती केली आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळं पारंपारिक शेती पुरवडत नसल्याने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहे. असाच प्रयोग राजेश पाटील यांनी केला आहे. शहादा येथील शेतकरी राजेश पाटील यांच्याकडे 20 एकर जमीन असून ते पारंपरिक शेती करत होते. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळं त्यांना मोठं नुकसान होत पारंपरिक शेती करत असताना त्यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग केला आहे. गेल्या वर्षी त्यांनी गुजरातहून  ड्रॅगन फ्रूटची रोपं आणली होती. आपल्या पाच एकर क्षेत्रात या रोपांची बाग लावली होती. एकूण आठ हजार रोपे त्यांनी लावली आहेत. ही रोपे आठ बाय बारा फूट या प्रमाणात लावण्यात आली आहेत. एकाच ठिकाणी चार रोपे लावून त्या ठिकाणी सहा फूट सिमेंटचा खांब उभा केला आहे. या खांबाला वरती गोल रिंग लावून त्याला छत्रीचा आकार दिला आहे. 


दोन वर्षात ड्रॅगन फ्रूटचा ही रोपे साधारणत: पाच ते सहा फूट उंचीर्पयत वाढली आहेत. आता त्यांच्या बागेतील रोपे दोन वर्षाची झाली आहेत, त्यांचं आता उत्पादनही सुरू झालं आहे. आतापर्यंत 80 ते 90 क्विंटल उत्पादन निघाले आहे. त्यातून 15 लाखांचे उत्पन्न राजेश पाटील यांना मिळालं आहे. बाहेरील व्यापारी येऊन जागेवर 150 रुपये किलोने खरेदी करत असल्याची माहिती शेतकरी राजेश पाटील यांनी दिली आहे.

Reels
या पिकाचे उत्पादन डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ड्रॅगन फ्रूट या फळझाडाला 25 वर्षापर्यंत उत्पादन येते. दरवर्षी साधारणत: जून ते डिसेंबर या काळात त्याला फळधारणा होते. निवडूंगाच्या झाडाप्रमाणेच हे काटेरी झाड आहे. वर्षभरानंतर त्याला फळधारणा सुरु होते. पहिल्या वर्षी कमी फळधारणा होते. पण दुसऱ्या वर्षापासून मात्र त्याचे उत्पादन दोन ते चार पटीने वाढते. सातपुड्याच्या डोंगराळ भागात आदिवासी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत, या शेतीकडे वळावे. यात चांगले उत्पादन मिळते आणि बाजारपेठ असल्यानं शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा विचार करुन शेती करावी, असे आवाहन राजेश पाटील यांनी केलं आहे. शेतीतील समस्या आणि नैसर्गिक आपत्तीचं भांडवल न करता पाटील यांनी प्रयत्न करत आदिवासी भागात ड्रॅगन फ्रूटची शेती यशस्वी केली आहे. 
महत्त्वाच्या बातम्या:
Parbhani: ‘परभणी जिल्ह्यात भारनियमन कशाच्या आधारे…’; बबनराव लोणीकरांचे फडणवीसांना पत्र
Paddy Procurement : देशात धान्याचा तुटवडा भासणार नाही, तांदळाची मोठ्या प्रमाणात खरेदी : केंद्र सरकार  
PM Kisan Kyc: ई-केवायसी पूर्ण न केल्याने मराठवाड्यातील साडेपाच लाखापेक्षा अधिक शेतकरी ‘पंतप्रधान निधीला’ मुकणार
Onion Price : नंदूरबारमध्ये कांद्याच्या उत्पादनात घट, दरात वाढ होण्याची शक्यता 
Bhima Sugar Factory Election : भीमा साखर कारखाना निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, 15 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
राग आल्यानंतर काय करता? चिमुकलीच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर, म्हणाले…
पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरचं ट्वीट अन् मोहम्मद शामीचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला…
PAK vs ENG, Final Match Highlights: बेन स्टोक्सनं काढली मॅच, टी20 विश्वचषक 2022 इंग्लंडचाच, पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय
Sam Curran : इंग्लंडच्या सॅम करनला मालिकावीराचा पुरस्कार, टी20 विश्वचषक इतिहासात प्रथमच गोलंदाजाला मिळाला मान
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2022 | रविवार

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares