Grape Damage : ज्याची भीती तेच झाले, व्यापाऱ्यांनीच द्राक्ष खरेदी थांबवली, निसर्गापुढे शेतकरी हताश – TV9 Marathi

Written by

|
Mar 27, 2022 | 3:27 PM
सांगली : नैसर्गिक संकटावर मात करीत उत्तर महाराष्ट्र आणि (Sangali District) सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Vineyard) द्राक्ष बागा जोपासल्या खऱ्या मात्र अंतिम टप्प्यात या शर्यतीमध्ये शेतकरीच हताश झाला आहे. द्राक्ष तोडणीच्या दरम्यान सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम थेट (Grape) द्राक्षावर झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाला तडे गेले आहेत. ऊन-पावसाच्या खेळात द्राक्ष उत्पादकांचे मात्र न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. याचा परिणाम उत्पादनावर तर होणारच आहे पण द्राक्ष तडकण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांनी थेट द्राक्ष खरेदीच बंद केली आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून सुरु झालेले संकट आता संपल्यावरच मिटणार अशी अवस्था आहे.
उत्पादनात घट झाल्यावर दर वाढणार हे बाजारपेठेचे सूत्र आहे. पण द्राक्षाच्या बाबतीत यंदा सर्वकाही उलटे होताना दिसत आहे. कारण यंदा उत्पादन घटले असताना हंगाम सुरु होताच द्राक्षाच्या दरात कमालीची घट झाली होती. वाढत्या उन्हाबरोबर द्राक्ष मागणीत वाढ होऊ लागली होती. मात्र, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. अजूनही शेकडो एकरावरील द्राक्ष हे बागेतच आहेत. विशेषत: तासगाव तालुक्यात अवकाळीने थैमान घातल्याने बागांमध्ये पाणी साचले होते.
ज्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष तोडणी झाली आहे त्यांच्यासाठी हा पाऊस चांगलाच आहे. पण ज्या बागांमध्ये द्राक्ष अजूनही वेलीवरच आहेत त्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी बागा जोपासण्यासाठी एकरी हजारो रुपये केवळ औषध फवारणीसाठी खर्ची केले आहेत. आता अंतिम टप्प्यात उत्पन्ना ऐवजी अशी निराशा होत असेल तर आगामी काळात द्राक्ष बागा ठेवल्या जातात की नाही अशी परस्थिती निर्माण होईल.
बदलत्या वातावरणामुळे द्राक्षांना तडे जाण्याची भीती असते. हेच गेल्या आठ दिवसांपासून सुरु आहे. अगोदर ऊन आणि त्यानंतर अवकाळी यामुळे द्राक्षामध्ये गोडवा उतरण्याऐवजी द्राक्षाला तडे जाण्याचीच अधिकची भीती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. शिवाय दर कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांचा हा डाव असल्याचाही आरोप काही शेतकरी करीत आहेत. मात्र, बदलत्या वातावरणाचा परिणाम काय असतो याची प्रचिती द्राक्ष उत्पादकांच्या अवस्थेवरुन लक्षात येत आहे.
Photo Gallery : ऊसाची फडातच राख, बीडमध्ये हंगामात 500 एकरातील ऊस जळून खाक
निसर्गाचा लहरीपणा त्यात बाजारपेठेतील अस्थिरता, गव्हाची विक्री की साठवणूक, पुन्हा शेतकरी संभ्रमात
Weather Report : अवकाळीचे संकट टळले, आता वाढत्या ऊन्हाचा चटका, मार्चच्या अखेरीस होणार अंगाची लाहीलाही

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares