आंदोलन: ऊसतोड बंद आंदोलनावर शेतकरी संघटना ठाम – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
मागील गळीत हंगामात एफाईरपी अधिक दोनशे तर २०२२-२०२३ साठी सरासरी उताऱ्याच्या आधारावर एकरकमी एफआरपी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यात १७ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ऊस तोडणीसह वाहतूक बंद आंदोलन करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांना दिले आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २१ व्या ऊस परिषदेत घेतलेल्या निर्णयानुसार पुणे येथील साकर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून १७ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील ऊस तोड व ऊस वाहतूक बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. साखर कारखानदारांसह सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे दोन दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे.२०२१-२०२२ मधील गाळपासाठी गेलल्या ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रूपये अंतिम भाव मिळावा व राज्य सरकारने ऊसासाठी दर नियंत्रण समिती स्थापन करून आरएसएफप्रमाणे भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश द्यावेत.
एफआरपीचे दोन तुकडे करण्यासाठी ऊस दर नियंत्रण अध्यादेशात केलेली दूरुस्ती मागे घेऊन, आगामी हिवाळी अधिवेशनात त्यात पुन्हा दुरूस्ती करावी. या दुरूस्तीत एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा करावा. तोपर्यंत कारखान्यांनी मागील वर्षीच्या सरासरी उताऱ्यांच्या आधारावर २०२२-२०२३ मध्ये एकरकमी एफआरपी द्यावी. तसेच ऊस तोडणी मजूर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फतच पुरवठा करावेत, जोपर्यंत हा निर्णय होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून अथवा कारखानव्यांकडून महामंडळाने वर्गणी वसूल करू नये. केंद्र सरकारने साठ लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यात अधिक तीस लाख टनाची वाढ करावी.
केंद्राने साखरेची साडेतीन हजार रूपये प्रतिक्विंटल निश्चित करून इथेनॉल किंमतीतही प्रतिलिटर पाच रूपयाची वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे. आंदोलन कालावधीत कारखानदारांकडून शेतकरी तसेच वाहतूकदारांवर दबाव आणल्यास लाक्षणिक नव्हे तर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. तसे निवेदन अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares