कोकण कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालकपदी डॉ. सावंत – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
(टुडे पान 3 साठी )
फोटो ओळी
-rat14p1.jpg-
62214
ः डॉ. प्रमोद सावंत
कोकण कृषि विद्यापीठाच्या
विस्तार शिक्षण संचालकपदी डॉ. सावंत
रत्नागिरी, ता. 14 ः कोकणातील शेती, शेतीपूरक व्यवसाय व कष्टकरी शेतकरी यांच्याशी निगडित शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून कार्यरत व गतवर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केलेले डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालकपदी डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
याच विद्यापीठाचे पदवीधर असलेले व तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मूळ रहिवासी डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यापीठाच्या विविध स्तरांवर काम केले आहे. सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख, कृषी शिक्षण सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, कुडाळचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव म्हणून डॉ. सावंत यांनी यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या ते कृषी महाविद्यालय, दापोलीचे विस्तार शिक्षण विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.
नवीन जबाबदारीच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी व विद्यापीठाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares