जनआक्रोश यात्रा काढणार: भारत जोडो यात्रा मॉर्निंग वॉकसारखी : अरुण सिंह – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
राजस्थान प्रदेश भाजप एक डिसेंबरपासून राज्यातील सर्व २०० विधानसभा मतदारसंघामध्ये जनआक्रोश यात्रा काढणार आहे. अशोक गहलोत सरकारला डिसेंबरमध्ये चार वर्षे पूर्ण होत आहेत. अशा वेळी भाजपने काँग्रेसला घेरण्यासाठी ही यात्रा आयोजित केल्याचे म्हटले जात आहे. तथापि, रविवारी झुंझुनूमध्ये आयोजित भाजप कार्यकारी समितीच्या बैठकीत प्रदेश प्रभारी अरुण सिंह यांनी हे धोरण समजावून सांगितले आणि म्हणाले, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मॉर्निंग वॉकसारखी आहे. मात्र, आम्ही जनआक्रोश यात्रेद्वारे राज्यातील आठ कोटी जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. यामध्ये २०० रथांसोबत हजारो कार्यकर्ते जनसंपर्क करतील, आंदोलन करतील.
यात्रेत सरकारविरोधी मुद्दे अरुण सिंह म्हणाले, जनआक्रोश यात्रेमध्ये काँग्रेस सरकारचे तुष्टीकरण, शेतकरी कर्जमाफीचे असत्य, महिला अत्याचाराची प्रकरणे, भ्रष्टाचार आदी मुद्द्यांचा समावेश असेल. ते म्हणाले, राज्य सरकारचे मंत्री स्वत: सांगत आहेत की, पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये इतके आमदार निवडून येतील की, ते सर्व एकाच फॉर्च्युनरमध्ये बसून येतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares