Akola : पीक वाचविण्यासाठी रात्री बेरात्री धडपड – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
शिरपूर जैन : यंदा परतीच्या पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले त्यात मुबलक भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला.अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करीत एकदाचा खरीप हंगाम संपला, आता रब्बी हंगाम सुरू झाला. रब्बी पिकांचे उत्पन्न चांगले व्हावे यासाठी रात्री बेरात्री शेतकरी धडपड करीत आहे. कारखान्यांना ज्याप्रमाणे वीज वितरण कंपनी चोविस तास वीज पुरवठा करते त्याप्रमाणे जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना सलग वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. ज्यांना चोवीस तास वीज मिळते त्यांच्या प्रमाणेच शेतकऱ्यांनाही जीव आहे त्यालाही रात्री बेरात्री शेतात काम करताना भीती वाटते. मात्र याकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. पिकांच्या हंगामात शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.
ऐन हंगामाच्या वेळीच विजेचा लपंडाव व भारनियमचे ओझे शेतकऱ्यांच्या खांद्यावर लादले जाते.हंगामात वेळेवर वीज मिळत नसल्याने शेतकरी वैतागून जात आहेत.वीज वेळेवर मिळत नाही तेव्हा सिंचन कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो तर रात्री उशिरा शेतीसाठी वीज मिळत असल्याने शेतकऱ्याला जीवाची पर्वा न करता रात्री बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. जगाच्या पोशिंद्या बाबत होत असलेला दुजाभाव , महावितरणच्या वेळकाढू धोरणाचा फटका शेतातील पिकांना बसतो. या दरम्यान सिंचन कसे करायचे० असा प्रश्न उपस्थित होतो.
गत काही वर्षांपासून अस्मानी संकटाने शेतकऱ्यांना चांगलाच फटका दिला.जगाच्या अन्न धान्य पुरविणाऱ्या पोशिंद्याची मोठी फरफट होत आहे. त्याचा जगण्यासाठी संघर्ष पाहून कुणालाही कशी त्याची कदर येत नाही. संबंधित शेतकरी आर्थिक, मानसिक बाबतीत सध्या नेस्तनाबूत झाला आहे. त्यामुळे किमान रब्बी हंगामात तरी व्यवस्थित सलग वीज मिळावी ही त्यांची रास्त अपेक्षा आहे. शेतकरी आपल्याला होत असलेल्या त्रासामुळे विवंचनेत आहे. यावर्षी रब्बीच्या पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त आहे. खरिपाचे पावसाने नुकसान केले.आता तरी नियमित व पूर्ण विद्युत दाबाने वीज पुरवठा होणे गरजेचे आहे. शेतकरी नेहमीच समस्या सांगतात मात्र त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते.तसेच सिंचनासाठी नियमित व्यवस्था होईल याकडे शासनाने गंभिर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे.
दिवसा वीजपुरवठा व्हावा
रात्री विजपुरवठा पूर्ण क्षमतेने होत असला तरी विंचू, सापासह इतर वन्यप्राण्यांची भीती शेतकऱ्यांना असते.आठवड्यात काही दिवस दिवसा वीजपुरवठा होतो, परंतु व्होल्टेज राहत नसल्यामुळे मोटार बरोबर चालत नाहीत,तर बऱ्याचदा कमी दाबामुळे मोटर पंप जळतात. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्रीऐवजी दिवसा सलग विद्युत पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.रात्रीला वीज कमी दाब यामुळे शेतकरी आर्थिक, मानसिक विवंचनेत आहे व पुरता तो वैतागले आहे.
भारनियमनाच्या नावावर वीजपुरवठा बंद
संकटांनी त्रस्त शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर टाकत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीजपुरवठा कसा होईल याकडे लक्ष वेधने गरजेचे आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares