Maharashtra News Updates 13 November 2022 : तुर्कीतील इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोट, 11 जण जखमी – ABP Majha

Written by

By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 13 Nov 2022 11:50 PM (IST)
मुंबई – पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात अपघात… 
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात.. 
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला ट्रकची धडक.. 
अपघातात बसमधील प्रवासी जखमी, ट्रकचालक आणि बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी…. 
जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी 
रायगड – 
मुंबई – पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात अपघात… 
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात.. 
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसला ट्रकची धडक.. 
अपघातात बसमधील प्रवासी जखमी, ट्रकचालक आणि बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी…. 
जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी ..
तुर्कीतील सर्वात मोठं शहर असलेल्या इस्तंबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. इस्तंबुलमधील तक्सिम चौकात हा स्फोट झाला असून त्यामध्ये 11 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे कळवा खाडी पुलाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे काही वेळात हे लोकार्पण होईल त्या आधी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यक्रम स्थळावर आले ..यावेळी त्यांनी या पुलाच लोकार्पण  होतय याचा आनंद आहे ..पुल बनून तयार होता मात्र लोकार्पण झाला नव्हत आज होतय..लोकांना माहीत आहे कुणी पाठपुरावा केलाय …पुलाच्या दोन्ही बाजूने झालेल्या बॅनर बाजी बाबत बोलताना आव्हांड यांनी श्रेय घ्यायचे नाही मात्र लोकांना माहीत आहे काम कुणी केलंय अस म्हणत फिल्मी स्टाईलने बेगाने शादी में अब्दूलला दिवाना असा टोला नाव घेता मुख्यमंत्र्यांना लगावला 
 रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांना ( Railway Passengers ) दिलासा दिला आहे. यूटीएसमध्ये ( UTS ) मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुक करण्यासाठीच्या अंतराच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुकिंगसाठीच्या अंतराची मर्यादा वाढवण्यात आली आहे. उपनगरीय  ( Suburban ) तिकिटांसाठी अंतराची मर्यादा दोन किलोमीटरवरुन पाच किलोमीटर करण्यात आली आहे. तर गैर-उपनगरीय ( Non-Suburban ) तिकिटांसाठी अंतराची मर्यादा पाच किलोमीटर यांच्यावरुन 20 किलोमीटर करण्यात आली आहे. यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.
Maharashtra Dhule News : धुळे जिल्ह्यात सध्या 290 बोगस डॉक्टर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आत्तापर्यंत केवळ मात्र आठ जणांवरच कारवाई करण्यात आली आहे. धुळ्यात सर्वाधिक 93 तर साक्री तालुक्यात 86 शिरपूर तालुक्यात 70 आणि सर्वात कमी शिंदखेडा तालुक्यात 41 बोगस डॉक्टरांची नोंद आहे. 
धुळे जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या दहा महिन्यात फक्त आठ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली असून या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी तालुका स्तरावर समित्या गठीत करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 290 बोगस डॉक्टर असल्याची माहिती समोर आली असून यात सर्वाधिक बोगस डॉक्टरांची संख्या धुळे तालुक्यात आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समित्यांकडून कारवाईच होत नसल्याने या समित्यांच्या कार्याबाबत देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
Beed News : शिक्षण संस्थेमध्ये रुजू का करून घेत नाही? आणि पगार का देत नाही? या कारणावरून बीडमध्ये संस्था चालक आणि भाजप कार्यकर्ता असलेल्या अनुरथ सानप यांना काही दिवसांपूर्वी धक्काबुक्की करण्यात आली होती. याच प्रकरणी एका महिन्यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धक्काबुक्की करणारा शिक्षक त्याची पत्नी आणि आई-वडील अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुराधा सानप यांची शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेमध्ये अनेक शिक्षकांच्या पगारी होत नव्हत्या आणि काही शिक्षकांना रुजू करून घेतले जात नव्हतं. त्यामुळे या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं हे उपोषण सुरू असतानाच भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अनुदान सानप यांना उपोषण करणाऱ्या शिक्षकाने व त्यांच्या पत्नीने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. 
उल्हसगरमध्ये तब्बल 127 झाडांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, या प्रकरणी पर्यावरण प्रेमींनी पोलिसात धाव घेत पालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली आहे. कॅम्प नंबर चार येथील VTC मैदानात राज्य सरकारचा स्टेडियम बनवण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प सुरू आहे, आणि या प्रकल्पात बाधा येत असल्याने हे झाड परवानगी शिवाय तोडल्याची प्राथमिक माहिती पर्यावरण प्रेमी सरिता खानचंदानी यांनी दिली आहे, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करणार आहेत.
कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अद्याप देखील कायम आहे. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर देखील मोठया संख्येने पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. प्रसिद्ध अशा गणपतीपुळेमध्ये आज देखील गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे आता व्यावसायिक देखील समाधानी झाल्याचे दिसत आहेत.
धुळे जिल्ह्यात सध्या 290 बोगस डॉक्टर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आत्तापर्यंत केवळ मात्र आठ जणांवरच कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात धुळे तालुक्यात सर्वाधिक 93 तर साक्री तालुक्यात 86 शिरपूर तालुक्यात 70 आणि सर्वात कमी शिंदखेडा तालुक्यात 41 बोगस डॉक्टरांची नोंद आहे. धुळे जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या दहा महिन्यात फक्त आठ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली असून या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी तालुका स्तरावर समित्या गठीत करण्यात आले आहेत जिल्ह्यात 290 बोगस डॉक्टर असल्याची माहिती समोर आली असून यात सर्वाधिक बोगस डॉक्टरांची संख्या धुळे तालुक्यात आहे, बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समित्यांकडून कारवाईच होत नसल्याने या समित्यांच्या कार्याबाबत देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
भंडारा : धान पिकाच्या मळणीसाठी ट्रॅक्टर लावून मळणी करीत असताना अचानक ट्रॅक्टरला लागलेल्या आगीत ट्रॅक्टरसह 4 एकरातील धान पिकाचे ढीग जळून खाक झाले. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील रोहणी शेतशिवारात घडली आहे. धान मळणी मशीनही आगीत सापडल्याने मळणी मशीनदेखील अंशतः जळाली. यात आनंदराव समरीत नामक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या अथक प्रयत्नातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती यासह विविध मागण्या मान्य केल्यात. याचा  इंदापूर प्रहार अपंग क्रांती व दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने इंदापूर शहरात वाजता गाजत पदयात्रा काढत एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आलाय.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत येणार असून विविध रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान शिंदेगटाकडून डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या आगमनाचे बॅनर लावत वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. डोंबिवलीत मधील काही रिक्षावाले एकवटले असून त्यांनी रिक्षावर ‘मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे स्टिकर लावले आहेत. याबाबत डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाल्याने त्यांना पाठींबा देण्यासाठी स्टिकर लावले असल्याचे सांगितलं आहे.
राहूल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा 16 नोव्हेंबरला अकोला जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. 16, 17 आणि 18 नोव्हेंबरला जिल्ह्यातील पातूर, वाडेगाव ते बाळापूर असा या पदयात्रेचा प्रवास असणार आहे. अकोला पोलिसांनी या पदयात्रेसाठी विशेष तयारी सुरू केलीय. गेल्या चार दिवसांपासून 200 पोलीस कर्मचारी-अधिकारी एमआयडीसी परिसरात पायी चालण्याचा सराव करत आहेत.. 
धुळे : दुचाकीने घराकडे निघालेल्या एका व्यापाराच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून वाहनाच्या डिक्कीत असलेली 25 लाख रुपयांची रोकड चार जणांनी लुटून नेल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील माधव कॉलनीत काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. परेश पटेल असे या व्यापाऱ्याचे नाव असून शहरातील माधव कॉलनी परिसरात राहणारे पटेल हे दुचाकीने घराकडे येत असताना त्यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या चार जणांनी त्यांना अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली तसेच त्यांच्या वाहनाच्या डिक्कीत असलेली 25 लाख रुपयांची रोकड लंपास केली तसेच त्यांच्या वाहनाचा देखील एकाने ताबा घेत तिघे मोटरसायकल वरून पसार झाले, यावेळी परिसरातील एकाने या लुटारूंना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवला, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाणी केली यावेळी संशयितांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.. याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Maharashtra Pune News : विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी विविध विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात केलीय. विद्या प्रतिष्ठान येथे कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे प्रश्न अडीअडचणी सोडविण्याकरिता ते जनता दरबार देखील अजित पवार घेणार आहेत. दुपारी बारामती तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी पवार करणार आहेत. 
Buldana Congress Conflict : येत्या 18 तारखेला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यात येत आहे, ही यात्रा शेगाव येथे 18 तारखेला मुक्कामी असून त्यानंतर ही पदयात्रा जळगाव जामोद मार्गे मध्यप्रदेशात जाणार आहे मात्र मध्यप्रदेशात जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग असूनही फक्त काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत गटबाजीमुळे या पदयात्रेचा मार्ग बदलण्यात आल्याचा आरोप  कार्यकर्त्यांनी केला आहे. सोयीस्कर मार्ग सोडून अतिशय चिंचोळ्या व खराब आणि काटेरी रस्त्याने ही पदयात्रा आता नेण्यात येणार असल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. भारत जोडो ऐवजी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचाच सामना काँग्रेस नेत्यांना करावा लागत आहे.
रविवारी पहाटे मुंबईतील वांद्रे कुर्ला कोलॅक्स परिसरात जिओ सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वीवर्क बिल्डिंग, बीकेसी येथून सुरू झालेल्या 100 किमी सायकलोथॉन रॅलीने खेरवाडी, वांद्रे आणि वरळी विभागाचा मार्ग व्यापला आणि 100 किमीचा प्रवास केला. अंतरानुसार रॅलीची विविध श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली. यापैकी 5 आणि 10 किमीची रॅली बीकेसीपासून सुरू होऊन बीकेसी येथे संपली. जिओने आयोजित केलेल्या सायक्लोथॉन रॅलीमध्ये हजारो मुंबईकर सहभागी झाले होते. चित्रपट अभिनेते सुनील शेट्टी आणि टायगर श्रॉफ या कलाकारांसोबतच विश्वास नांगरे पाटील, वृषाली शिंदे हा रॅलीत सहभागी झाले आणि हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.
India-China Border Issue : भारत-चीन संबंधांवरील पूर्व लडाखमधील परिस्थितीबाबत, भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले आहेत की, ‘पूर्व लडाखमधील परिस्थिती स्थिर आहे परंतु बेभरवशाची आहे.’ भारत-चीन सीमावादावर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra News : शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी वेळेत उपचार  केल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या ातेवाईकांी केला आहे .फलटण तालुक्यातील गोखळी येथील अकरावीत शिकत असलेला अक्षय साधू धुमाळ वय वर्ष अठरा हा मुलगा शेतात गवत आणायला गेला असता मंगळवारी दुपारी याला विषारी सापाे दंश केला होता. त्यांतर उपचारासाठी त्याला बारामती येथील सिल्वर जुबली हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती बिघडत असल्यानं त्याला महिला ग्रामीण रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आले त्याच दिवशी रात्री दहा वाजता मुलाला ससू येते शिफ्ट करावे लागेल असे येथील डॉक्टरांनी मुलाच्या वडिलांा सांगितले. मुलाच्या वडिलांी ंतर आपल्या मुलाला रात्री बारा वाजता बारामती शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र आज उपचारादरम्या अक्षय साधू धुमाळ याचा मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिरंगाई आणि हलगर्जीपणा केल्याने मुलाचा मृत्यु झालाय असा अरोप मुलाचे वडील साधु धुमाळ यांी केलाय. धुमाळ यांा एकच मुलगा होता. जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत ाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार ाही असा पवित्रा मुलाच्या वडिलांी आता घेतला.
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…
Bharat Jodo : राज्यातील 250हून अधिक लेखकांचा भारत जोडोला पाठिंबा; राहुल गांधींकडे पत्राद्वारे केल्या या मागण्या…
Bharat Jodo Yatra: कन्याकुमारी ते काश्मीर अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यान एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. आता असंच एक नवं अपडेट समोर आलं आहे. राज्यातील 250हून अधिक लेखक आणि कलाकारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह माजी सनदी अधिकारी आणि लेखक, कलाकार आज राहुल गांधीच्या यात्रेत पाहायला मिळाले.
आज लेखक, साहित्यिक दत्ता भगत , गणेश देवी, श्रीकांत देशमुख, जगदीश कदम, लक्ष्मीकांत देशमुख, भगवंत क्षीरसागर,विजय वाकडे, अभिजित शेट्ये यांच्यासह काही अन्य लेखकांनी राहुल गांधींशी भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच एक पत्रही त्यांना दिले. ज्यात या लेखकांनी काही मागण्या केल्या आहेत.  सध्याचे सरकार आम्हाला पसंद नाही. तुमचेही सॅाफ्ट हिंदुत्वही आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका देखील लेखकांनी राहुल गांधींसमोर मांडली. 
माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी म्हटलं की, आम्ही आमची भूमिका आधी तपासली. देशात जे सध्या चालू आहे त्यावरुन आम्ही एक निवेदन केलं. आम्ही राहुल गांधींना सॉफ्ट हिंदुत्वाच्या भूमिकेबाबतही बोललो. शिक्षण उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. केंद्र आणि राज्य दोन्हीकडून शिक्षणासाठी किमान 10 टक्के वाटप करणे ही आपल्या तरुणांची आणि मुलांच्या भविष्याची आणि भविष्याची गरज आहे, असा विचार करून समर्थन करतो.  शेती ही भारताची मूलभूत आणि टिकाऊ संस्कृती आहे आणि आमचे कष्टकरी शेतकरी हे आमचे “अन्नदाता” आहेत परंतु चुकीच्या आणि शोषणात्मक धोरणांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्यांची चिंताजनक संख्या चुकीची आणि शेतकरी विरोधी धोरणे दर्शवते. आमच्या लेखकांनी शेतकर्‍यांचे दु:ख आणि त्यांचा दैनंदिन संघर्ष बळजबरीने मांडला. कारण आपल्यापैकी बरेच जण आधी शेतकरी आणि नंतर लेखक आहेत आणि त्यांना खूप काळजी वाटते. आम्हाला आशा आहे की भविष्यात या कृषी समस्यांचे निराकरण करण्यासाठी शेतकरी समर्थक धोरणे चांगली असतील. शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आम्ही अशा उपायांचे जोरदार समर्थन करतो, असं देशमुख यांनी म्हटलं.
मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती! केंद्रीय पथकाकडून सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठिकाणी पाहणी
मुंबईकरांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. कारण मुंबईमध्ये गोवर रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचं समोर आल्यानंतर केंद्राकडून देखील दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय पथकाकडून आज गोवरचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या एम-पूर्व विभागात जात ठिकठिकाणी पाहणी करण्यात आली.  उद्या देखील केंद्रीय पथकाकडून गोवरचा उद्रेक असलेल्या विभागात जात पाहाणी आणि आढावा घेतला जाणार आहे.
Jitendra Awhad: …तर रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होतात; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया
जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंगाचा आरोप चुकीचा, हेतुपुरस्सर आरोप केले जातायत : अंजली दमानिया
Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान
T20 World Cup 2022: आसीसीच्या सर्वोत्तम संघात विराट, सूर्याला स्थान; तर हार्दिकची 12वा खेळाडू म्हणून निवड
T20 WC 2022: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडचं जबरदस्त सेलिब्रेशन; ड्रेसिंग रुममधील खास व्हिडीओ समोर

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares