Solapur : मंगळवेढा इतर मंडल मधील नुकसानीच्या भरपाई बाबत शाशंकता – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मंगळवेढा : परतीच्या पावसाने तालुक्यात नुकसान झालेल्या आठ मंडल मधील सहा मंडळ मधील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चे पंचनामे करण्यासाठीची अंमलबजावणी कागदोपत्रीच राहिल्यामुळे बाधित झालेल्या शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्यातील सर्वच महसूल मंडल मधील बाजरी तूर मका कांदा सोयाबीन रब्बी ज्वारी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले परंतु शासनाने सॅटेलाईटचा आधार घेत आंधळगाव व भोसे या दोन मंडल मधील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. वास्तविक पाहता इतर मंडल मध्येही परतीचे पावसाने नुकसान केलेच आहे परंतु त्याचबरोबर काही वेळा सलग पावसामुळे देखील या पिकाचे नुकसान झाले त्यामुळे या मंडल मधील पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत.चार नोव्हेंबर रोजी नंदुर येथे झालेल्या कार्यक्रमात आ. समाधान आवताडे यांनी सर्वच पिकाचे नुकसानीच्या पंचनामे करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आले होते
त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी देखील तशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या मात्र त्याबाबत या यंत्रणेने म्हणावी तसी दखल घेतली नाही दरम्यान शुक्रवारी निवासी नायब तहसीलदार सुधाकर धाईजे यांनी तालुक्यातील सततच्या पावसाने नुकसान झालेल्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याची माहिती माध्यमांना दिली. मात्र शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत तर सध्या जिल्हा प्रशासनाने 4000 कोटीच्या नुकसानीच्या संदर्भातील 426 कोटीची नुकसान भरपाई ची प्रस्ताव तयार केला. त्यामध्ये इतर मंडल मधील नुकसानीच्या पंचनाम्याच्या अहवाल शासनाला कधी सादर करणार आणि उशिरा सादर केल्यावर येथील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का ? असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या प्रश्नावर विरोधी पक्षाला देखील आवाज उठवण्याची संधी असताना देखील विरोधी पक्ष देखील शेतकऱ्याच्या प्रश्नावर मूक गिळून गप आहे त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका ही फक्त निवडणुकीपुरतीच असल्याची शेतकरी वर्गातून बोलले जाऊ लागले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या राजकीय चढउतारात तालुक्यातील शेतकरी वर्ग मात्र भरडला जात आहे
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतून शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची संधी कमी असल्यामुळे तालुक्यात यंदा फक्त 18 हजार शेतकऱ्यांनी विमा भरला. त्यामध्ये आठ हजार शेतकऱ्यांनी तक्रार केली.तरीही विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून काही गावात दोनदा पडताळणीचा प्रयत्न करत शेतकऱ्याला नाहक त्रास देण्याचा प्रकार घडला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागरूकतेमुळे 2020 साली सरसकट नुकसान भरपाई देत 40 कोटीची मदत महाविकास आघाडी सरकारकडून मिळवली मात्र यंदाही शेतकऱ्याचे नुकसान होऊन देखील भरपाई पासून वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यास नुकसान दिसून येणार आहे परंतु या निष्काळजीपणा बाबत संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
श्रीमंत केदार तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares