कारखान्यांच्या गेटपुढे आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
.. तर कारखान्यांच्या
दारात ठिय्या आंदोलन
आंदोलन अंकुश ः २० नोव्हेंबरपर्यंत मुदत
जयसिंगपूर, ता. १५ : ऊस उत्पादकांचा आक्रोश कारखानदारांना समजावा म्हणून कारखान्यांच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याची माहिती, ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.
चुडमुंगे म्हणाले, ‘गेली तीन वर्षे महापूर आणि कोरोनामुळे शेतीचे अर्थचक्र अडचणीत आल्याने ऊस उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. गेल्या वर्षभरात साखर धंद्यात तेजी निर्माण झाल्याने कारखाने मोठ्या नफ्यात आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कारखाने एफआरपीपेक्षा जादा दर देऊन सावरतील असे वाटत होते. जिल्ह्यातील इतर कारखाने ३२००, ३१०० रुपये दर जाहीर करत आहेत. अठरा दिवस रक्ताचे पाणी करून शेतकऱ्यांच्या भावना कारखाने, लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्यापर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचवल्या. मात्र, आंदोलन मोडून काढले जात आहे. पोलिसी बळ वापरून आंदोलनच करायचे नाही, अशी परिस्थिती निर्माण करत आहेत. खोट्या केसेस दाखल करून आंदोलनात कोणी येऊ नये, अशी दडपशाही सुरू आहे. कर्नाटक आणि सांगली जिल्ह्यातून पोलिसांच्या मदतीने ऊस आणून कारखाने सुरू असल्याचा दिखावा सध्या सुरू आहे. चालूला परवडणारा दर आणि मागील हंगामाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय थांबायचे नाही, असे आम्ही ठरवले असून आता प्रत्येक कारखान्याच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. २० नोव्हेंबरपर्यंत जर कारखान्यांनी जाहीर केलेला दर वाढवला नाही, तर सोमवारी (ता. २१) दत्त साखर कारखान्यापासून ठिय्या आंदोलनास सुरुवात होईल.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares