नेदरलँडच्या मृदा शास्त्रज्ञाकडून चिकू बागायतीची पाहणी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
बोर्डी, ता. १५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील चिकू बागायतदार गेल्या काही वर्षांपासून चिकू फळगळ रोग, बी पोखरणारी अळी, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव अशा रोगाने त्रस्त आहेत. यावर विविध अंगाने माहिती उपलब्ध करून उपाय योजना करण्यासाठी प्रगतिशील शेतकरी कुणाल माळी, मिलिंद बाफना, चिराग मेहता यांच्या चिकू बागायतीला नेदरलॅंडमधील मृदा जीव शास्त्रज्ञ डॉ. पायस फ्लो यांनी भेट दिली.
डॉ. पायस फ्लो यांनी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव आणि प्रा. उत्तम सहाने तसेच अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांसोबत चिकू बागेत जाऊन पाहणी केली. तेथील समस्या प्रत्यक्ष तपासल्या आणि विविध विषयावर चर्चा केली. यामध्ये मातीचे आरोग्य, हवामानाचा परिणाम, झाडांची छाटणी कधी आणि कशी करावी, झाडांना खताची मात्रा कशा पद्धतीने द्यावी याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. या भेटी दरम्यान महाराष्ट्र राज्य चिकू संघाचे अध्यक्ष विनायक बारी, संजय अढिया, स्नेहल पोतदार, दिनेश माळी, हार्दिक बाफना, मगन माच्छी, शापुर बारी, सुशील मिश्रा, नरेश बोथरा, हार्दिक अढिया, मणिलाल माच्छी, प्रवीण बारी आदी प्रयोगशील शेतकऱ्यांनी चर्चेत भाग घेतला.

बोर्डी : मृदा जीव शास्त्रज्ञ डॉ. पायस फ्लो यांनी चिकू बागायतीची पाहणी केली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ विलास जाधव आणि इतर चिकू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares