बंदिस्त जलवाहिनी योजना कायमची बंद व्हावी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
ऊर्से, ता. १४ : पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांसाठी पिण्यासाठी असणारे अत्यावश्यक पाणी नेण्यासाठी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हालचाली सुरू झाल्याने ही बंदिस्त जलवाहिनी योजना कायमची बंद व्हावी याबाबत भारतीय किसान संघाने मागणी केली आहे.
बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द व्हावा याबाबत भारतीय किसान संघाने वेळोवेळी लढा दिला आहे. नुकतीच महिन्यापूर्वी पाणी नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हालचाली सुरू झाल्या. याबाबत आयुक्त व जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. पिंपरी-चिंचवडसाठी पवना बंदिस्त जलवाहिनी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. कोट्यावधी रुपयांच्या या योजनेस स्थगिती दिल्याने गेली दहा वर्षापासून ही योजना बंद आहे. मात्र या योजनेस मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने अतिशय संवेदनशील असणारा विषय कसा हातळायचा हा प्रश्न पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जलसंपदा अधिकारी यांच्यासमोर उभा आहे.
जलवाहिनी प्रकल्पासाठी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आंदोलने करणारी भारतीय किसान संघाने पुन्हा बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात आवाज उठविला आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष शंकर शेलार व पदाधिकारी यांनी हा प्रकल्प कायमचा रद्द व्हावा यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन दिले आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तांनी हा प्रकल्प सुरू करण्याचा घाट घातल्याने त्या विरोधात मावळ तालुक्यातील शेतकरी, भारतीय किसान संघ तीव्र आंदोलन करेल. याची नोंद प्रशासनाने घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी जिल्हाध्यक्ष शंकराव शेलार, उपाध्यक्ष शिवाजी पवार, तालुकाध्यक्ष विश्वनाथ शेलार, प्रवीण गोपाळे, तुकाराम टिळे, ज्ञानेश्वर मराठे, दशरथ कदम, नारायण ढोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares