रब्बी हंगाम धोक्यात: साहेब, एक तर वीजपुरवठा सुरळीत द्या, नाही तर तुमच्या हाताने मरण तरी द्या – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. त्यामुळे हाताशी आलेले खरिप पीके पूर्णतः उद्ध्वस्त झाली. आता कशीबशी शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी ७० टक्के पूर्ण केली आहे. पंरतु महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. सतत विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे पेरणी केलेली कोवळी पिके खराब होत असल्याने रविवारी पिंपळगाव रेणुकाई व रेलगाव येथील शेकडो शेतकरी पिंपळगाव रेणुकाई येथील उपकेंद्रावर धडकले. अन् साहेब एक तर विज द्या, नाही तर आम्हाला तुमच्या हाताने मरण तरी द्या! असा संतप्त सवाल केल्याने विद्युत वितरण अधिकारी देखील या प्रश्नावर निरुत्तर झाले. विद्युत पुरवठा सुरळीत करतो असे आश्वासन दिल्यावरच शेतकरी शांत झाले. पिंपळगाव रेणुकाई परिसरात यंदा पर्जन्यमान चांगले असल्याने सर्वच भागात मुबलक पाणी उपलब्ध आहे. विहिरी देखील काठोकाठ भरल्या आहे. परतीच्या पावसामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढू अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पिंपळगाव रेणुकाई परिसरात सध्या रब्बी पेरणीने वेग घेतला आहे. शेतकऱ्यांची जवळपास “७० टक्के रब्बी पेरणी पूर्ण झाली आहे.
यात मोठ्या प्रमाणात गहु, हरभरा तसेच मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम दिड पट वाढला आहे. पेरणी केलेली पीके देखील आता जमिनीच्या बाहेर येऊ लागली आहे. आता या पिकांना पाण्याची निंतात आवश्यकता आहे.माञ महावितरणकडुन नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचा खेळ सुरू आहे. विहिरीत मुबलक पाणी असून देखील शेतकऱ्यांना सतत विद्युत पूरवठा खंडीत होत असल्यामुळे पिंकाना पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. दुपारी पडत असलेल्या कडक उन्हामुळे ही कोवळी पिके कोमेजुन चालली आहे.
याबाबत संबंधित जबाबदार अधिकार्याकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.आधीच ओल्या दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना रब्बीकडून अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी तडजोड करुन रब्बी पेरणी केली आता या पिंकाना वेळेवर पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.महावितरणला वारंवार कल्पना देऊन देखील विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने रविवारी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी येथील विद्युत उपकेर्दांत जाऊन ठिय्या आंदोलन करीत महावितरणच्या काराभाराबाबत रोष व्यक्त केला.
आम्हाला विज द्या नाही तर मरण द्या असा संत्पत सवाल यावेळी शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांच्या रोष पाहुन अधिकाऱ्यांनी देखील विज पुरवठा सुरळीत करु असे आश्वासन दिल्याने शेतकरी शांत झाले. या उपकेद्रावरुन पिंपळगाव रेणुकाई, लेहा, पारध बु, पारध खुर्द, शेलुद, अवघडराव सांवगी, रेलगाव, मोहळाई, कोसगाव वरुड, कोळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांना विज पुरवठा करण्यात येतो.
पंरतु प्रत्येक गावात विजेची सारखीच बोंब असल्याने शेतकरी आता महावितरणच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत दिसून येत आहे. यावेळी शेतकरी रामकृष्ण आहेर, विनोद बेराड, प्रभूआहेर, ज्ञानेश्वर सास्ते, हिरामन बेराड, विष्णु आहेर, प्रविण आहेर, संतोष सपकाळ, विजय आहेर, विजय नरवाडे, राहुल बलरावत, दिनेश डोभाळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या संदर्भात महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या फोन नेहमीप्रमाणे नाँटरिचेबल असल्याचे कळाले.
महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात आला
यंदा पाणी मुबलक असल्यामुळे गहू, हरभरा, मकाची रब्बी पेरणी केली आहे. मात्र , आता पिकांना पाण्याची आवश्यकता असताना सतत विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. महावितरणकडे वारंवार तक्रारी करुन देखील फक्त उडवाउडवीचे उत्तरे मिळत आहे. महावितरणमुळे आमच्या परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. रविवारी आंदोलन घेऊन उपकेंद्रावर गेलो होतो. -रामकृष्ण आहेर, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares