Ahmednagar : पाण्यासाठी वाट्टेल तो संघर्ष करणार – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
बोधेगाव : तालुक्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लाडजळगाव, अधोडी, दिवटे, शेकटे, बोधेगाव, बालमटाकळीसह तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळग्रस्त असल्याने, पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होतेय.
भविष्यात पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचनाचा प्रश्न हाती घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून, त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष करण्याची तयारी ठेवली असल्याचे मत संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथे विविध शेतकऱ्‍यांच्या ऊसशेती तसेच इतर पिकांची पाहणी आणि ऊस तोडणी मजुरांच्या भेटी दरम्यान ते बोलत होते.
यावेळी ऊस उत्पादक शेतकरी राजेंद्र मराठे माजी उपसरपंच भागवत तहकीक, अंबरनाथ तहकीक, सारथी अर्बनचे चेअरमन जयदीप तहकीक, ॲड. किरण तहकीक, बाळासाहेब गजमल, आदित्य मराठेसह ऊसतोडणी मजूर यावेळी उपस्थित होते.
गेल्या वर्षी शेतकऱ्यांना टनाला २४०० भाव दिला असून, या वर्षी देखील चांगला भाव देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तसेच शेतकऱ्‍यांना अधिकचा फायदा मिळवून देण्यासाठी उपपदार्थ निर्मितीचा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
प्रताप ढाकणे, अध्यक्ष ढाकणे कारखाना
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares