Todays Headline : शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी तसेच जितेंद्र आव्हाडांच्या – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Nov 2022 05:15 AM (IST)
Edited By: धनाजी सुर्वे
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
Todays Headline :  धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी  होणार आहे. चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. काल कोर्टानं दोन्ही बाजूंना त्यांची बाजू लिखित स्वरूपात मांडण्याचे आदेश दिले होते. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची आज विदर्भात एंट्री होणार आहे. याबरोबरच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 
 शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी  
धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी  होणार आहे. चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.  काल कोर्टानं दोन्ही बाजूंना त्यांची बाजू लिखित स्वरूपात मांडण्याचे आदेश दिले होते.  आज यावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची आज विदर्भात एंट्री 
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची आज सकाळी 7.30 वाजता विदर्भ एन्ट्री होणार आहे.  
जितेंद्र आव्हाड यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी

Reels
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे.   
राम कदमांचे घाटकोपर येथे आंदोलन
दिल्लीतील श्रद्धाचा मर्डर लव्ह जिहादचा प्रकार होता का याची चौकशी करावी अशी मागणी राम कदमांनी दिल्ली पोलिसांकडे केली आहे. याबाबत आज राम कदम घाटकोपर येथे आंदोलन करणार आहेत. 
राहुल शेवाळे यांची पत्रकार परिषद 
बाळासाहेब ठाकरेंचा 17 नोव्बेंबरला स्मृतिदिन आहे. यानिमित्त शिंदे गटाकडून  आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी राहुल शेवाळे यांची पत्रकार परिषद होणार आहे. 
कोल्हापुरात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
 गायरान अतिक्रमण हटावच्या विरोधात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा असणार आहे. जिल्ह्यातील गायरान या ठिकाणी झालेल्या अतिक्रमण काढण्याच्या आदेशाला विरोध केला जाणार आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील देखील या मोर्चात सहभागी असतील. सकाळी ११ वाजता या मोर्चाला दसरा चौकातून सुरुवात होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी एकाच व्यासपीठावर असणार आहेत. आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.  
 
 विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रकार परिषद 
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. 
आपच्या  प्रीती शर्मा मेनन यांची पत्रकार परिषद
धारावी पुनर्विकासाबाबत राज्यसरकारच्या घोटाळ्याचा आप पर्दाफाश करणार. धारावी पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्ष रेंगाळत आहे. याबाबत राज्यसरकारच्या ध्येय आणि धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठीं आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन पत्रकार परिषद घेणार आहेत. 
 
सुषमा अंधारे यांची कोल्हापुरातील कुरुंदवाडमध्ये सभा 
 शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड या ठिकाणी सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून गेलेले खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघांमध्ये ही सभा होणार आहे. 
 
परभणीत ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
ओला दुष्काळ, शेतकरी मदत आणि पीक विम्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. रविंद्र वायकर, अंबादास दानवे, खासदार संजय जाधव आदी नेते उपस्थित राहतील. 
 
 
Maharashtra News Updates 15 November 2022 : अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
खुशखबर! आमदारांचे गाडी चालक आणि पीएच्या पगारात घसघशीत वाढ
CM Eknath Shinde : अन् मुख्यमंत्र्यांनी भाषण थांबवून ‘त्या’ विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बोलावले.. काय घडलं नेमकं 
CM Eknath Shinde : आदिवासी बांधवांचा निसर्गाला समजून घेण्याचा गुण महत्वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2022 | मंगळवा
IPL 2023 Retention : पोलार्डसह डॅनियल सॅम्स, उनाडकट सारख्या स्टार्सना मुंबईचा अलविदा, IPL 2023 साठी कोणाला केलं रिटेन आणि कोणाला रिलीज? वाचा सविस्तर
Measles Outbreak in Mumbai: गोवर संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांचे बीएमसीला निर्देश
IPL 2023 Retention : मोठी बातमी! सनरायजर्स हैदराबाद संघाने कर्णधार केन विल्यमसनला केलं रिलीज!
अफजलखानाच्या कबरीजवळ कोथळा बाहेर काढत असलेला छत्रपतींचा भव्य पुतळा उभारणार; राज्य सरकारची घोषणा 
गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अशोक चव्हाणांसह महाराष्ट्रातील चौघांचा समावेश

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares