आंदोलन: पांदण रस्त्याच्या मागणीसाठी युवकाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शेतात जाणारा पांदण रस्ता तयार करून द्या, या मागणीसाठी घेऊन गोेरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील युवक संदीप राजेंद्र सरजारे (वय २६) याने गावातीलच राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पाणी टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. पाच वर्षापासून शेतकरी संदीप सरजारे यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, रस्ता नसल्याने शेतीची कामे करावी कशी हा प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाकडे धाव घेतली.अनेकदा संबंधित विभागाकडे न्याय मागूनही न्याय न मिळाल्याने सोमवारी दुपारी १२ वाजता संदीप हा गावातीलच पाणी टाकीवर चढला असून न्याय मिळेपर्यंत टाकीच्या खाली उतरणार नाही अशी आंदोलनात्मक भूमिका त्याने घेतली आहे, तसेच मागणी मान्य न झाल्यास टाकीवरून उडी घेणार असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares