सातारा जिल्ह्यात कारखानदाराकडून शेतकऱ्यांची गळचेपी – राजू शेट्टी – ELokmanya News Portal

Written by

टीम ई-लोकमान्य | सातारा – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाला तीन हजारांहून अधिक दर देतात.तर सातारा जिल्ह्यात साखर कारखानदारांकडून ऊस दराबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली जाते. स्वत:च्या फायद्यासाठी या जिल्ह्यातील सर्व कारखानदार एकत्र येत असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या ऊस दरासाठी एकत्र येऊन साखर कारखानदारांना आपली एकसंघ ताकद दाखविण्याची गरज आहे. असे ठोस प्रतिपादन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. 
खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे  काल (सोमवारी ता.१४) परिसरातील गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना शेट्टी बोलत होते.यावेळी  संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, सांगली 
जिल्हाध्यक्ष महेश खराडे,सातारा जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख, राजेंद्र माने,  तालुकाध्यक्ष दत्‍तात्रय घाडगे,  सुर्यभान जाधव, सुर्यकांत भुजबळ ,प्रमोद देवकर, श्री. लावंड, सचिन पवार, शरदशेठ खाडे, पृथ्‍वीरात गोडसे, राजीव मुळीक, राजू फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड व दराबाबत गळचेपी तसेच ऊस बिलांची 
थकीत रक्कम देण्यास विलंब  करणाऱ्या साखर कारखानदारांनी यासमस्यांबाबत तातडीने लक्ष द्यावे.अन्यथा साखर कारखानदारांना गुडघ्यावर आणू असा 
इशारा  देऊन राजू शेट्टी म्हणाले की कोल्हापूर,सांगली जिल्ह्यात गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी ऊसाचे आंदोलन सुरू झाले.गावोगावी लोकांच्यात जागरूकता निर्माण केली.त्यावेळी हा माणूस माथेफिरू आहे, भस्मासूर आहे म्हणून आपणास 
हिणविले गेले.आपल्यावर अनेक आरोप केले तरीही न डगमगता आपण अव्याहतपणे कष्ट घेऊन शेतकऱ्यांना ऊस शेतीबाबत पूर्ण अर्थकारण समजून सांगितले, साखर 
सम्राटांकडून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक दाखवून दिली त्यावेळी शेतकरी जागरूक झाले. आज या दोन्ही जिल्ह्यात ऊसाला तीन हजार रूपयांहून 
अधिक दर  दिला जातो.मात्र सातारा जिल्ह्यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक होताना दिसते.जिल्ह्यात अडीच हजारांच्या आसपासच ऊस दर दिला 
जातो.स्वत:च्या फायद्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखानदार एकत्र येत असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या ऊस दरासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.तालुक्यातून जाणाऱ्या पुणे बंगळूरू या ग्रीन कॉरीडॉरच्या अखत्यारीत येणाऱ्या जमिनींना योग्य दर 
द्यावा.येत्या गुरूवारी (ता.१७)  व शुक्रवारी (ता.१८ ) रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात  ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उतरण्याचा निर्धार केला आहे. ऊस वाहतूकदारांनी आपली वाहतूक बंद ठेवून 
सहकार्याची भूमिका दाखवावी. 

टीम ई-लोकमान्य | मुंबई- तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे.काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे.लोक ऐकून घेत असतात…पहात असतात …लक्षात ठेवत असतात…काहीजण सहज बोललो…
टीम ई-लोकमान्य | मुंबई – परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर शाळेमधील विद्यार्थ्यांना आज बालदिनाची अनोखी भेट मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले.. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या..त्यांच्या मनातल्या…
टीम ई-लोकमान्य | मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय…
टीम ई-लोकमान्य | मुंबई- मुख्यमंत्र्यांसमवेत त्या महिलेचे फोटो दिसत आहेत. एकंदरीतच त्यानंतर त्या महिलेने रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराचा निषेध करावा तितका कमीच आहे.पोलिसांचा गैरवापर…
टीम ई-लोकमान्य | मुंबई- माझ्यावर कुठलाही गुन्हा नोंदवला असता तरी चालले असते परंतु ३५४ हा गुन्हा मला मान्य नाही.आणि जो मी आयुष्यात केला नाही.पोलिसांनी हा गुन्हा कसा काय…
Your email address will not be published. Required fields are marked *


We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

© 2021 ELokmanya Media’s -Designed By Shubham Nadhavale(7757910341)
© 2021 ELokmanya Media’s -Designed By Shubham Nadhavale(7757910341)

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares