‘स्वाभिमानी’तर्फे मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
62425
————
‘स्वाभिमानी’तर्फे मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा
इचलकरंजी, ता. १५ : शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, सोयाबीन पिकावर पडलेला यलो मोझेक रोग, आणि लम्पी आजाराने मृत जनावरांच्या मालकांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिरढोण यांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिले. २४ नोव्हेंबरपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला. मागण्यांचे निवेदन शिरेस्तेदर संजय काटकर यांनी स्वीकारले.
निवेदनात शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले प्रोत्साहनपर अनुदान २०१९ ची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानुसार काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. मात्र अद्याप बरेच शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. शासन आचारसंहितेचे कारण पुढे करीत अनुदान देण्याचे टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्मधून असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. खरीप हंगामामध्ये घेतलेल्या सोयाबीनवर आकस्मिक यलो मोझेक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा उतरवला होता. मात्र विमा कंपनीने जाणीवपूर्वक केवळ दोन मंडळासाठी यलो मोझेक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे नमूद केले. संपूर्ण तालुक्याला यलो मोझेक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे नमूद करून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा. शासनाने लम्पी रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या जनावरांसाठी घोषित केलेली नुकसान भरपाई जलद द्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे नमूद केले आहे. विश्वास बालिघाटे, के. बी. चौगुले, संतोष मगदूम, सुमतीनाथ शेट्टी, अनिल शिंदे उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares