Maharashtra News : संजय राऊतांना १०० दिवसांनी जामीन मंजूर; राज्यातील इतर घडामोडींची माहिती वाचा एका क्लिकवर… – Loksatta

Written by

Loksatta

Mumbai News Updates, 09 November 2022 : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची चर्चा आहे. सर्वच स्तरातून या विधानाचा निषेध केला जात असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण सद्या चांगलेच तापले आहे. हा विषय दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात आहेत. शंभर दिवसांनंतर बुधवारी राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने शहरातील ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटत जल्लोष केला.

सविस्तर वाचा

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. वाचा सविस्तर बातमी…
उरणमधील वीर वाजेकर महाविद्यालय आणि परिसरात शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी हे पूर्व विभाग,भेंडखळ,नवघर येथून येथून ये-जा करत असतात. यासाठी एसटी बस पकडण्यासाठी विद्यार्थी हे नवघर उड्डाण पुलाच्या टोकाला असलेल्या एका वळणावर उभे असतात. एकाच वेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उभे राहत असल्याने आणि त्यात हे वळण लहान असल्याने या ठिकाणी अपघाताची मोठी भिती व्यक्त होत आहे.

सविस्तर वाचा

नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलन करुनही महापालिका प्रशासन ढिम्म असल्याचा आक्षेप घेत येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे बुधवारी पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रतिकात्मक बोकड बळी देत अनोखे आंदोलन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सविस्तर वाचा…
इतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे तिन्ही हप्ते मिळाले, दिवाळीपूर्वी वेतनही झाले; परंतु जिल्हा परिषद शिक्षकांना अद्यापही थकीत हप्ते मिळाले नाही, दिवाळीपूर्वी वेतनही झाले नाही. या धोरणाचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात शिक्षकांनी बुधवारी काळ्या फिती लावून तसेच शासनाला १ रुपयाची मनिऑर्डर पाठवून निषेध नोंदवला. सविस्तर वाचा…
परदेशात घर घेऊन देण्याच्या मागणीसाठी डॉक्टर जावयाने मुलीसह नातवंडांना अमेरिकेत डांबून ठेवल्याची तक्रार शहरातील एका महिलेने केली आहे. या प्रकरणी अमेरिकेतील जावयासह सासरच्या ठाणे आणि मुंबई येथील पाच जणांविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा
केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल शुक्रवारपासून (११ नोव्हेंबर) दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, कार्यकर्ता मेळावा, शेतकरी आणि महिला बचत गटांचा मेळावा ते घेणार आहेत.

सविस्तर वाचा
केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल शुक्रवारपासून (११ नोव्हेंबर) दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, कार्यकर्ता मेळावा, शेतकरी आणि महिला बचत गटांचा मेळावा ते घेणार आहेत.

सविस्तर वाचा
विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यातील यश वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा अनेक गुणांवर अवलंबून असते. विद्यार्थ्य्यांनी ज्ञानाचा वापर करून नवीन मार्ग दाखवत देशाला जगात महासत्ता म्हणून घडवावे, असे मत भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख डॉ. सोमनाथ एस यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा
भरधाव वेगात धावणारी दुचाकी वांद्रे येथे पदपथावर धडकून झालेल्या अपघातात मुद्दसीर रबाब खान (१७) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दुचाकीस्वार इम्रान अकबर खान (२१) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. इम्रान मुद्दसीरचा चुलत भाऊ आहे.

सविस्तर वाचा
कांदिवलीतील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सापडलेल्या नवजात बालिकेच्या आईचा शोध घेण्यात समतानगर पोलिसांना यश आले आहे. नोकरीचे आमीष दाखवून नातेवाईकानेच तरूणीवर बलात्कार केला आणि त्यामुळे गरोदर झालेल्या तरूणीने या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच बालिकेला जन्म दिला. दरम्यान, तरूणीने नवजात बालिकेला तेथेच टाकून पलायन केल्याची कबुली पोलिसांना दिली. सविस्तर वाचा…
बंगळुरू येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून बीएआरसीमधील वैज्ञानिकाला परिचित व्यक्तीने १३ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. याबाबत ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. सविस्तर वाचा…
करचोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या संजय भंडारी यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी ब्रिटनमधील वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने तसे आदेश दिले आहेत. दरम्यान न्यायालयाने आदेश दिलेले असले तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे प्रकरण ब्रिटनचे गृहसचिव सुएला ब्रेव्हरमॅन यांच्याकडे जाणार आहे. ब्रेव्हरमॅन यांनी सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर संजय भंडारी यांचे भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल. दरम्यान, संजय भंडारी यांच्यावर नेमके आरोप काय आहेत? त्यांना भारतात कधी आणले जाणार यावर नजर टाकुया. वाचा सविस्तर
जहाल नक्षली शंकर राव उर्फ वाचम शिवा याची हत्या केल्याच्या ठपका ठेऊन नक्षल्यांनी सहकारी नक्षल्याची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा गावानजीक घडली. दिलीप उर्फ नितेश गजू हिचामी (२६) असे मृत नक्षलीचे नाव असून, तो एटापल्ली तालुक्यातील झुरी या गावचा रहिवासी होता.
सविस्तर वाचा…
ठाणे : ठाण्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटाचा खेळ बंद पाडल्यानंतर मनसेनेने चित्रपटाला समर्थन देऊ केल्याने राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा सामना रंगला असतानाच, आता असे वाद टाळण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाला एक पर्याय सुचविला आहे. बातमी वाचा सविस्तर…

दहशवादाला वित्त पुरवठा केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी नुकतेच आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यात देशात मुंबई व इतर प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी हवालाच्या माध्यमातून विदेशातून पैसे पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ कोठडीत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते संजय राऊत यांना आज १०० दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांना ‘ईडी’कडून अटक करण्यात आली होती. दरम्यान, राऊतांना जामीन मिळाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच तोफ पुन्हा रणांगणात आली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सविस्तर वाचा
काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. या यात्रेचा खर्च अडीच वर्षात महाविकास आघाडीने भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांमधून होतो आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला होता. दरम्यान, या आरोपाला आता काँग्रेस नेते भाई जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळेंनी फार जास्त काही बोलू नये. आम्ही एक-एक कुळी बाहेर काढली, तर समस्या होईल, असे ते म्हणाले. सविस्तर वाचा
गेल्या तीन महिन्यांपासून ‘ईडी’ कोठडीत असलेले खासदार संजय राऊत यांना १०० दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे. कथीत प्रत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली होती. दरम्यान, संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे लढवय्ये नेते असून ते लवकरच बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या. सविस्तर वाचा
खडकवासला धरणात महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केल्याची शक्यता पोालिसांनी व्यक्त केली आहे. बातमी वाचा सविस्तर…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेदरम्यान मृत पावलेले सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातर्फे २५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली. पांडे यांचा नांदेड जिल्ह्यात पदयात्रेदरम्यान हृदयविकाराने मंगळवारी मृत्यू झाला.
सविस्तर वाचा…
पुणे : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचे काम जिल्ह्यात जोरात चालू असतानाच खेड तालुक्यात या प्रकल्पाच्या कामाला संरक्षण विभागाकडून खोडा घालण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणचे काम तूर्त थांबविण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर…

‘लम्पी’ चर्मरोगाच्या साथीने जिल्ह्यात थैमान घातले असून गेल्या एका आठवड्यात तब्बल २७ जनावरांचा ‘लम्पी’मुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कनिष्ठ अधिकारी याचे खापर मुख्यालयी न राहणाऱ्या वरिष्ठांवर फोडत असून पशुपालक अधिकाऱ्यांच्या बेपर्वा वृत्तीने बेजार झाले आहेत. सविस्तर वाचा…
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत अस्थिमज्जा प्रत्यारोपण नसल्याने सिकलसेल, थॅलेसेमियाग्रस्तांना आर्थिक अडचणीमुळे उपचार घेता येत नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा योजनेत समावेश करण्याची विनंती केली आहे. सविस्तर वाचा…
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या बीडीडी चाळ प्रकल्पाला लागलेल्या विलंबामुळे आर्थिक गणित बिघडले असून म्हाडाला प्रत्यक्षात काही हजार कोटींचा तोटा सहन करावा लागणार असल्याचा अहवाल मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या लेखाधिकाऱ्यांनीच उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला आहे. सविस्तर वाचा…
बालदिनाचे औचित्य साधून १४ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत शालेय भूजल सप्ताह राबविण्यात येणार आहे. भूजल योजनेची शपथ घेणे, अटल भूजल योजनेची चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. बातमी वाचा सविस्तर…

‘लिव्ह इन पार्टनर’चा दाऊद टोळी अथवा दहशतवादी संघटनेसोबत संबंध आहे. तसेच त्याने घरातील ५० लाख रुपयांचे दागिने चोरले असून त्याच्याकडे बंदुक असल्याची तक्रार कुलाबा येथील ५४ वर्षीय महिलेने पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी ४५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. सविस्तर वाचा…
महाविकास आघाडीच्या काळात फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून एका युवतीला कारागृहात टाकले, संजय राऊतांनी एका महिलेला शिव्या घातल्या, पुण्यातील एका महिलेच्या मोटारीत पिस्तूल ठेवली. तो महिलांचा अपमान नव्हता का ? एकीकडे महिला सन्मानाच्या गोष्टी हाकायच्या तर दुसरीकडे महिलांना हिन वागणूक द्यायची, ही सामाजिक विकृती आहे.
सविस्तर वाचा…
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट होऊन या शहराचे नगरनियोजन बिघडविण्यास कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारीच जबाबदार आहेत. डोंबिवली, कल्याण मध्ये बेकायदा इमारती उभ्या राहत असताना पालिका अधिकाऱ्यांनी नेहमीच भूमाफियांशी संगनमत करुन या बेकायदा बांधकामांना अभय दिले.
सविस्तर वाचा…
रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. दीपाली सय्यद यांनी अखेर यावर शिक्कामोर्तब केलं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंना लक्ष्य करत गंभीर आरोप केला.
सविस्तर बातमी
राज्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटातील दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दीपाली सय्यद बुधवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. या भेटीआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी आपण स्वीकारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे, नीलम गोऱ्हे यांच्यावरही टीका केली.
सविस्तर बातमी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून तरुणाची मोटारीखाली चिरडून हत्या करणाऱ्या दाम्पत्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यात अकरा साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापत्नेकर यांनी हा निकाल दिला. सविस्तर वाचा…
पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी निविदा प्रक्रिया न राबवता वाढीव दराने जुन्याच खासगी कंपन्यांना कामाचे कंत्राट देण्यात आले. बातमी वाचा सविस्तर…

राज्यात अनेक सरकारे आलीत आणि गेलीत मात्र, महिलांचे प्रश्न आजही कायम आहेत. लाखो रुपये खर्चून मोठ-मोठे रस्ते बांधण्यात आले. परंतु कोणत्याही महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहेच नाही. यामुळे प्रवासादरम्यान महिलांची मोठी कुचंबणा होते. याचा प्रत्यय सत्ताधारी पक्षातील भाजप महिला प्रेदश अध्यक्षा चित्रा वाघ यांना आला.
सविस्तर वाचा…
सार्वजनिक सुट्टीमुळे गोपाळ कृष्ण गोखले पुल परिसरातील वाहतुक मंगळवारी सुरळीत होती, परंतु या ठिकाणचे वाहतुक नियोजन करण्यासाठी वाहतुक पोलिसांनी विविध उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. तसेच याबाबत वाहतुक पोलिसांनी महापालिकेला पत्र लिहून विविध मागण्या केल्या आहेत. तसेच पुढील सहा महिन्यात पुलाच्या एका बाजूचे काम करण्याबाबतची विनंती करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. सविस्तर वाचा…
राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेतील आमदारांनी पैसे खेऊन बंडखोरी केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यासाठी ‘खोके’ हा विशेष शब्द वापरला जात आहे. असे असतानाच बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात २५०० कोटी रूपयांचा अब्रुनुकसान दावा ठोकणार असल्याचे शिवतारे म्हणाले होते. तशी घोषणा त्यांनी काल (८ नोव्हेंबर) केली होती. वाचा सविस्तर
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या मिशन बारामती मोहिमेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नोव्हेंबर महिनाअखेर पुन्हा बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा निश्चित झाला असून दोन महिन्यांतील त्यांचा हा दुसरा दौरा आहे. बातमी वाचा सविस्तर…

डोंबिवली ते बोईसर ही सकाळी ५.५० ची पॅसेंजर गेल्यानंतर सकाळी ६ ते सकाळी १० वेळेत एकही पॅसेंजर दिवा, पनवेल येथून वसई दिशेने धावत नसल्याने ठाणे, डोंबिवली, बदलापूर भागातील नोकरदारांचे सर्वाधिक हाल होत आहेत. सविस्तर वाचा…
आईला अश्लील लघूसंदेश व चित्रफित पाठविल्याच्या रागातून एकाने हिंगोलीहून आलेल्या चुलत भावाचा खून केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली. या प्रकरणातील संशयित भावासह त्याच्या तीन साथीदारांना देवळाली पोलीस व गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. सविस्तर वाचा…
अकोला : जिल्ह्यात युतीमध्ये भाजपच्या वर्चस्वाखाली दबलेल्या शिवसेनेपुढे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संघटनात्मक वाढीचे शिवधनुष्य पेलावे लागेल. युवा सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात शिवसेनेने अकोला शहर व बाळापूरमध्ये शक्तिप्रदर्शन केले. बातमी वाचा सविस्तर…

पुणे : एरंडवणे येथील म्हात्रे पुलाजवळील नदीकाठच्या रस्त्यावरील अडथळा दूर झाला आहे. रजपूत झोपडपट्टीतून जाणाऱ्या आणि एक दशकाहून अधिक काळ रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर…

आजाराला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बजाजनगरमध्ये उघडकीस आली. रामरती दिनेश शाहू (४१) रा. कैकाडी नगर झोपडपट्टी असे मृत महिलेचे नाव आहे. रामरती यांनी २ नोव्हेंबरला घरी गळफास लावला. कुटुंबीयांनी त्यांना लगेच खाली उतरवून मेडिकल रुग्णालयात भरती केले. सविस्तर वाचा…
स्वयंघोषित मीडिया विश्लेषक अजित पारसे याने व्यापारी, प्राध्यापक, व्यावसायिक आणि धनाढ्य महिलांनाच नव्हे तर चक्क कायदेतज्ज्ञ असलेल्या दोन वकिलांनाही वेगवेगळी आमिषे दाखवून लाखोंनी फसवणूक केल्याचा कारनामा उघडकीस आला आहे. याबाबत पोलीस चौकशी करीत असल्याची माहिती आहे. सविस्तर वाचा…
शहरात घेण्यात आलेल्या ज्युनियर मिस इंडिया फॅशन शो कार्यक्रमाचा भारतीय स्त्री शक्तीसह अन्य महिला संघटनांनी निदर्शने करत विरोध केला. यावेळी आयोजक संस्थांना निवेदन देत यापुढे लहान मुलींच्या सौैदर्य स्पर्धा न घेण्याचा इशारा दिल्याचे भारतीय स्त्री शक्तीच्या हर्षदा पुरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सविस्तर वाचा…
कार्यकाळ संपताच मागील आठ महिन्यात भाजपच्या ७० टक्के माजी नगरसेवकांचा त्यांच्या प्रभागातील जनतेशी संवाद संपल्याची बाब पक्षाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या अहवालाची गंभीर दखल घेत याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते बैठक घेणार असल्याची माहिती आहे. सविस्तर वाचा… सविस्तर वाचा…
उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात आतापर्यंत चार जणांचे बळी घेणाऱ्या एसएएम – II या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. जिल्ह्यात वन्यजीव आणि मानव संघर्षात मोठी वाढ झाली आहे. दर एक-दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. ब्रम्हपुरी परिसरातील जंगलात वाघांच्या हल्ल्यात मनुष्यहानीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. सविस्तर वाचा…
प्रत्येक क्षेत्रात महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. उच्च शिक्षण, लग्नानंतर स्वत:चे ‘करिअर’ करण्यावर भर, या व इतर तत्सम कारणांमुळे ४० ते ४५ टक्के महिला वयाच्या तिशीनंतर आई होत असल्याचे निरीक्षण उपराजधानीतील स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. सविस्तर वाचा…
आपण रेल्वे मध्ये लोको पायलट आहोत. आपली रेल्वेत खूप ओळख आहे. असे दाखवून एका तोतया लोको पायलटने कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात राहत असलेल्या महिलेला रेल्वेत नोकरी लावतो सांगून २१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, एका आरोपीला अटक केली आहे. सविस्तर वाचा…
औरंगाबाद : राजकारणात समांतर रेषांना उभा, आडवा किंवा अगदी काटकोनातही छेद द्यावा लागतो. दुसऱ्यांची रेषा पुसून असो किंवा स्वत:ची रेषा वाढवून असो, उभे-आडवे धागे विणताना सामान्य माणूस केंद्रस्थानी असावा अशी अपेक्षा असते आणि हीच जाणीव वाढविणारा शिवसैनिक अशी अंबादास दानवे यांची प्रतिमा. बातमी वाचा सविस्तर…

पुणे : उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आव्हान देणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नियोजित पुणे दौऱ्याला तूर्त विरोध न करण्याची भूमिका शहर मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. बातमी वाचा सविस्तर…


पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चर्चगेट, तसेच विरारच्या  दिशेने जाणाऱ्या जलद लोकल विलंबाने धावत आहेत. मध्य रेल्वेवरील धीम्या आणि जलदलोकल सेवेचा ऐन गर्दीच्या वेळी बोजवारा उडाला असून लोकल रद्द होत असल्याची उदघोषणा काही स्थानकांत करण्यात येत आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares